या चि गुणी संपन्न : श्रीधरस्वामी
॥ श्री आप्पास्वामी समर्थ ॥
श्री महादेवनाथ चरित्र ह्या ग्रंथाविषयी लिहितांना मला अत्यानंद वाटतो़ ग्रंथकार श्री महादेवदास ह्यांनी केलेल्या संतचरित्राचे मौलिक लेखनाप्रित्यर्थ त्यांचे हार्दिक आभनंदऩ
संतचरित्र लेखनाची बैठकच वेगळी असते़ ग्रंथकर्त्याची स्थिती, लेखनामागील पे्ररणा, लेखनाचा पाया, लेखनाची फलश्रृती या आणि अशा अनेक बाबतीत संतचरित्रे लेखनामागचे वेगळेपण लक्षणीय व मननीय असते़ आत्मतृप्ती, ग्रंथकर्त्याची स्थिती, सर्वांच्या उद्धाराची तळमळ व गुरूआज्ञा ह्या पे्ररणा़ स्वानुभव हा पाया़ वाचकांचे लौकिक व पारलौकिक कल्याण ही फलश्रृती़ या द्वारे हे वेगळेपण स्पष्ट होते़ ही सारी वैशिष्टे प्रस्तुत चरित्रग्रंथात आढळून येतात़ ही समाधानाची बाब आहे़ पू़ महादेवनाथ महाराजांनी अगदी सामान्य प्रापंचिकाच्या अवस्थेपासून जगावर प्रेम वर्षाव करणार्या संत अवस्थेपर्यंतचा जीवन प्रवास याचि देहि केलेला आहे़ त्यांची सर्वांविषयी सहानुभूती, कळकळ व स्वानुभवातील निश्चितता या ग्रंथात विशेषतेने जाणवते़
हा ग्रंथ मुख्यत्वे सामान्य, अज्ञ-भाविक जनांना स्वहिताचा मार्ग मिळावा यासाठी केला आहे़ ते काम तर घडतेच आहे़ तसेच ज्ञानमार्गी मुमुक्षू, सुशिक्षित, जिज्ञासू, साधक मंडळींनाही प्रपंच-परमार्थाच्या वाटचालीत अमूल्य उपयोगी ठरणारा आहे़ या ग्रंथात भक्तियोगाचा महिमा प्रतिपादित करीत असता आणि जीवन दर्शन घडवित असतांना महाराजांच्या व्यक्तित्वातील प्रमुख पैलूंचा विचार केला गेला़
श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार नाथांनी वैष्णव धर्माचे पालन केले़ या दृष्टीने त्यांची सार्वत्रिकता लक्षणीय आहे़
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
नाथांजवळ प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाचा विचार होता़ जात-पात, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेद त्यांनी केलेला नाही़ स्वहिताचा विचार करू इच्छिणार्या माणसाला त्यांनी मार्ग दाखविलेला आहे़ समाजातील अंध रूढी, परंपरा यांच्या विरुद्ध प्रबोधन केले आहे़ परमार्थाच्या क्षेत्रात सर्व जीव समान मानून मार्गदर्शन केले आहे़ या ग्रंथाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथकाराची सुबोधता़ तत्त्वानुसार स्वभावाची, वर्तनाची वर्णने असोत, साक्षात्काराची महती असो, व्यवहार-निज तत्त्व साधनामार्ग आदीचे विवरण असो सर्व बाबतीत सोपी भाषा, रसाळ कथा भाग व्यवहारिक घटना प्रसंगांची उदाहरणे, परिचित संत वचनांचा आधार, छोट्या आटोपशीर कथा-वस्तुची सुटसुटीत मांडणी या सार्यांमुळे या ग्रंथाला सुबोधता आली आहे़
मोकळे मन रसाळ वाणी । या चि गुणी संपन्न ॥
असा अनुभव ग्रंथ वाचतांना येतो समाजातील विविध स्तरातील लोकांची अनुभवावर आधारीत चित्रे ह्यात रेखाटली आहेत़ मानवी मनाचा सूक्ष्म अभ्यास, सोपे विवेचन वास्तववादी वाटते़ त्याचप्रमाणे ग्रंथकाराची संपन्न काव्यरचना अभिमानरहित आहे़
अनुभवे आले अंगा । ते या जगा देतसे ॥
याप्रमाणे त्यांची भाषा हेतुपुरस्सर नटवलेली अशी नसून वाचकांच्या चित्ताला आकर्षून घेणारी आहे़ ग्रंथकारांनी रचलेली काव्यरचना काव्याच्या कसोटीवर निःसंशय उतरते़ अंतःकरणातील उत्कटभाव, प्रेम हा काव्य कळेचा आत्मा होय़ हा त्यांच्या काव्याचा स्थायीभाव होय़ सद्गुगुरुंचा उपदेश, उपासना, वेगवेगळे उपक्रम याची आत्यंतिक ओढ आवट गोडीने नाथ भक्तांमध्ये स्थिरावली आहे़ सद्गुरुची शिष्याप्रती असलेली जिव्हाळ्याची रीत हेच या गोडीचे, श्रद्धा, निष्ठा कारण होय़ गुरू प्रेमातूनच जो आत्मिक समाधानाचा एक अत्युच्च क्षण ग्रंथ निर्मितीच्या रुपाने देऊन जातो़ तो न वर्णवे तो वाणी़ श्री गुरूचे महिमान जाणणार्या व परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आक्रमू पाहणार्या शहाण्या पुरुषाने श्री गुरूचे भजन करावे़ त्या श्री गुरूच्या भजनाने कृतकृत्य व्हावे़ श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात़
म्हणोनि जाणतेने गुरू भजिजे । तेणे कृतकार्य होईजे ।
जैसे मुळ सिंचने सहजे । शाखा पल्लव संतोषती ॥
या ग्रंथाची रचना हा एक गुरूकृपेचा साक्षात्कार म्हणावा लागेल़ अवघ्या साडेतीन चरणात संक्षेपाने, प्रभावीपणे, आटोपशीर अशी रचना पाहून संत एकनाथ महाराज दृष्टीगोचर होतात़ यावरुन ग्रंथकाराची अभ्यासू वृत्ती, जिज्ञासा, गुरूनिष्ठा सिद्ध होते़ तसेच नाथांच्या सहवासाचा परिणाम म्हणजे ग्रंथकारांनी नाथांच्या जीवनातील विविध पैलूंचे वर्णन उठावदारपणे केले आहे़ पू़ नाथ महाराज आत्म स्वरूपात रममाण झालेले असे संत़ प्रपंचात राहूनही अलिप्त अनासक्त़ त्यांना सुखदुःखाची बाधा नाही़ नाथ महाराज सामान्य पुरुष नव्हते़ समर्थांनी अशा सत्पुरुषांचे वर्णन करतांना म्हटले आहे़
करी वृत्ती जो संत, तो संत जाणा ।
नाथ अशाच निर्मल अंतःकरणाचे, रंजलेल्या, गांजलेल्या जीवांना जवळ करुन त्यांच्या उद्धाराचा मार्ग दर्शविणारे संत होते़ असे संत समाज जीवनात चैतन्य व चारित्र्य निर्माण करतात़ समाजातील विषमता, अज्ञान दूर सारतात़ बुडत्या जनांचा उद्धार करण्याची नाथांना लागलेली उत्कट तळमळ प्रस्तुत ग्रंथात प्रभावीपणे उमटलेली आहे़ त्यांना प्रपंचाचा पाश अडकवू शकला नाही़
आम्ही तरी आस । जालो टाकोनी उदास ॥
नाथ संसारात राहूनही नित्यमुक्त होते़ भक्तांनी आपले सारेच विषय भगवत चरणांवर समर्पित केलेले असल्याने त्यांना भक्तीपुढे मुक्तीही नको असते़ अज्ञानी लोकांना दिसणारा जो त्यांचे ठिकाणी माणूसपणाचा भाग दिसतो़ तो त्यांचा अज्ञान भ्रांतिमुळे होय़ माउली म्हणतात -
अगा अवचिता कापूरा । माजी सापडला हिरा । वरी पडलिया मिरा । न निगे केवी ॥
तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तर्ही प्रकृतिदोषाची मातु । नेणेचि की ॥
या स्थितीनुरूप नाथ निरासक्त वृत्तीने आपल्या हातरूण गावीच ठायीच बैसोनी करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा। ह्या तुकाराम महाराजांचे उपदेशानुसार शांती मठ निर्माण केला़ जनोद्धारासाठी आज सर्व जगाला ज्याची गरज आहे, पण प्राप्ती कठीण आहे; असे शांतीचे व्रत धारण करुन आपल्या भक्तगणांना तुकोबांच्या विचाराचा प्रसाद देत राहीले़ वर्तमान युगामध्ये सर्वत्र प्रदूषित वातावरणाची निर्मिती होऊन अशांती वाढली आहे़ अशा काळात ह्या अशांतीरूपी प्रदूषणाला नष्ट करण्याकरिता शांती निर्माण करणे ही काळाची गरज़ ती लक्षात घेऊन नाथांनी शांतीचा वसा घेतला़ श्री संत तुकाराम महाराज शांतीचे वर्णन करतांना म्हणतात -
शांती परते नाही सुख । येर अवघेचि दुःख ।
म्हणऊनि शांती धरा । उतराल पैलतिरा ॥
गंगेच्या तीरावरील कुटीरात राहणार्या मुलामुलींना केवळ गंगेच्या सान्निध्यामुळे पोहण्याचे कौशल्य जसे अभावित पणे प्राप्त होत असते़ तसे परमार्थ जगण्याचे, अध्यात्माच्या अनुभवाचे व भक्तियोगाच्या स्वारस्याचे रहस्य या शांती मठात नकळत कळून येते़ हातरूण गावी श्रीमद् भागवत सप्ताहाचे निमित्ताने सुमारे सहा वर्षे महाराजांचे भेटीचा योग यायचा़ ह्या भेटीतील अनुभव आजही मला आठवतात़
महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग त्यावेळी राजस्थानात उदयपूर येथे मुक्कामी असता माक्या कानी आवाज आला मला भगवंताची प्रेरणा झाली आहे़ मला जायचे आहे़ मी जाणार मी हा आवाज ऐकून क्षणभर चकित झालो़ आवाज ओळखीचा वाटत होता़ कुणाचा असावा? यावर विचार चालू असतांनाच लगेच प्रेरणा झाली़ हा आवाज हातरूणच्या नाथांचाच़ आणि यामुळे आधीच्या नाथभेटीचा सारा प्रसंग, संवाद आठवला़ निर्वाणापूर्वी हातरूण येथील झालेल्या भेटीत महाराजांशी झालेला संवाद मनाला धक्का देणारा होता़ तो संवाद नव्हे जणू दोघांचा करारनामाच़ जो आधी जाईल तेव्हा मागे राहणार्याने अंतसमयी विधी सारावा़ तेव्हाच मी महाराजांचे असे उद्गार लक्षात घेऊन माक्या शिष्यांना सूचना दिली होती़ गडे हो, नाथ महाराज जास्त दिवसाचे सोबती वाटत नाहीत़ ते काय किंवा मी काय, आमचे आता काही सांगता येत
नाही़ नाथांचे आधी मी गेलो तर नाथांना बोलावणे़ नाथ गेले तर मला बोलवायला विसरू नका़ मी कोठेही असो आल्याशिवाय राहणार नाही़ हा मागील भेटीचा समग्र वृत्तांत आठवला नि् त्वरित स्पेशल गाडीने निघालो़ अंदुरा येथे मुक्काम पडला़ दुसरे दिवशी पहाटेच खरेच नाथांच्या निर्वाणाचा संदेश मिळाला़ त्यावेळी नाथांचे अंतिम इच्छेनुसार प्रसंगी उपस्थित राहून स्वहस्ते त्यांना समाधी देण्याचे भाग्य मला लाभले़
आज सर्वत्र बुद्धिप्रामाण्याचा, वैज्ञानिकतेचा, प्रयत्नवादाचा रास्त पुरस्कार झाला आहे़ पण त्याचबरोबर सदाचार, त्यागवृत्ती, प्रेम, समाधान यांचा आढळ दुर्मिळ झाला आहे़ या ग्रंथाचे विवेचन बुद्धिप्रमाण, अनुभवाधिष्ठित, भक्तिप्रधान असल्याने कालोचित आहेच; त्याचबरोबर सदाचार, पे्रम, शांती, समाधान प्रत्येकाला कसे लाभेल याची पदोपदी काळजी घेतली आहे़
प्रस्तुत ग्रंथकार श्री महादेवदास सोनोने शैक्षणिकदृष्ट्या अल्पशिक्षित जरी असले, तरी त्यांच्याकडून ह्या संतचरित्राचे लेखन होणे हा नाथांचा कृपाप्रसादच होय़
महाराजांनी हातरूण येथे शांतिमंदिराच्या रूपाने लावलेली ज्योत तेवत ठेवण्यासाठी त्यांचे सुपुत्र चि़. जालंदरनाथ, चि़. श्याम आणि समस्त भक्तगण या सर्वांना परमेश्र्वर बल, बुद्धी, भक्ती व यश देवो अशी प्रार्थना करुन सर्वांना मनःपूर्वक आशीर्वाद़.
आपले मानवी जीवन परिपूर्ण व सफल करू इच्छिणार्या भाविकांनी, अभ्यासकांनी हा ग्रंथ आपले संग्रही ठेवून नियमित वाचन केल्यास सर्वांची ऐहिक-पारलौकिक कल्याणाची वाटचाल आपल्याकडून यशस्वीपणे पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना़
ॐ शांतिः शांतिः शांतिःहरी ॐ
-श्रीधरस्वामी
श्री आप्पास्वामी मठ, पंचगव्हाण
0 comments:
Post a Comment