गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११

गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ प्रसिद्ध झाला.जागतिक कीर्तिच्या प्रख्यात लेखिका शोभा डे,रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणार्‍या वर्षा उसगावकर यांच्यासह अनेक नामवंतांचा सहभाग असलेला हा अंक आहे. येथे *गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ * वाचा
*श्री नाथबाबा शांती मंदिर संस्थान,हातरुण ता.बाळापूर जि.अकोला_ सार्वजनिक न्यास नोंदणी क्र.ए-१६७३(अकोला)*
Related Posts with Thumbnails

मनोगत : ग्रंथकार : महादेवदास


ॐ नमो गुरुनाथा साई । त्रिवार नमन तुमचे पायी । तुमचीच सारी पुण्याई । प्रेरणा देई लिहावया ॥१॥ पाहिले मी किती ग्रंथात । गद्यरूपात मनोगत । लेखकाचे विचार सांप्रत । परी प्रकार यात निराळा ॥२॥ माझे काही परम भाग्य । वेळ ही आली यथायोग्य । नाथचरित्र लेखन सौभाग्य । आला योग लिहिण्याचा ॥३॥ हातरूण झाले तीर्थक्षेत्र । नाथभूमी पावन पवित्र । त्या नाथांचे असावे चरित्र । विचार सर्वत्र होऊ लागे ॥४॥ मागे मालपे सरांचा प्रताप । महादेव-यादव लेक-बाप । हातरूणचे नंदादीप । लाविला दीप ज्ञानाचा ॥५॥ गद्यरूपात हा ग्रंथ । आपणा दावी दोन्ही नाथ । अभंग आणि अन्वयार्थ । मुक्तचिंतन सार्थ ह्यात असे ॥६॥ काही भक्त आग्रह करिती । ओवीरूपात असावी कृती । बाबाच टाक घेती हाती । केली न पूर्ती या कार्या ॥७॥ दोन अध्याय पूर्ण केले । रामदासांचे शब्द आठवले । गाती वडिलांची किर्ती भले । न गणले शहाण्यात ॥८॥ माझी नसता काही प्राज्ञा । नाथ मज करिती आज्ञा । हे ठावे असे सर्व सुज्ञा । परी अवज्ञा होईना ॥९॥ यादवनाथ योगलीलामृत । बाबा हजर साक्षात । लिहू लागले हे हात । चालना देत बुद्धिसी ॥१०॥ ग्रंथ लिहून पूर्ण झाला । प्रकाशनाचा योग आला । बरीच वर्षे झाली त्याला । निजधामाला नाथ गेले ॥११॥ नाथपुत्र श्याम लहान । परी कार्य करी महान । सहाणेवरी उगाळता चंदन । सुगंध पवन नेत दूरी ॥१२॥ परंपरेचा वारसा । तोच संचिताचा वसा । डोईवर श्रीनाथ पसा । उमटे ठसा ज्ञानाचा ॥१३॥ पाहिले ऐकिले जे नाथ । भाग्यवंता लाभली साथ । तो सांप्रदाय पुनीत पंथ्ा । असावा ग्रंथ ओवीबद्ध ॥१४॥ श्री महादेवनाथ चरित्र । वाचू, ऐकू आम्ही सर्वत्र । भक्त मिळून एकत्र । नाथकृपापात्र व्हावया ॥१५॥ श्याम येऊन भेटला । हा प्रश्न पुढे रेटला । स्मृतिने गळा दाटला । परी वाटला खेद मनी ॥१६॥ वयाचा घेता अंदाज । पंचाहत्तर पुढे आज । गात्रे शिथिल होती सहज । होईल काज पूर्ण कसे ॥१७॥ वयाची उलटता साठी । बुद्धीही होतसे नाठी । हाती घ्यावी लागे काठी । ही परिपाठी सर्वांची ॥१८॥ श्यामसी करिता संभाषण । आठवतो आज तो क्षण । नाथची दिसती संपूर्ण । विसरलो भान देहाचे ॥१९॥ ज्याची जग वाणे कीर्ती । दृष्टी दिसता नाथमूर्ती । अंगी संचरली स्फूर्ती । वाटे कार्यपूर्ती होईल ॥२०॥ संत ओळखण्या हवा संत । मनी माक्या हीच खंत । परी नाथ कृपावंत । केले पसंत मजलागी ॥२१॥ सतत राहिलो नाथांसंगे । सुख-दुःखे साहिली प्रसंगे । जो अनुभव आला अंगे । तोच सांगे तुम्हा लोका ॥२२॥ अक्षय तृतीया आली । नाथांची पे्ररणा झाली । मूर्तीसमोर बसलो खाली । हात हवाली केले त्यांच्या ॥२३॥ पावन शांतिमंदिरात । केली असे सुरुवात । कार्य चाले आवरत । पंधरा अध्यायसत्र पूर्ण झाले ॥२४॥ पुढे उभा ठाकला आजार । सुटून गेला माझा धीर । ग्रंथ कसा पूर्ण होणार । चिंता-घोर वाढू लागे ॥२५॥ माझी ढासळता प्रकृती । नाथभक्त धीर देती । तना-मना सांभाळिती । मजसी जपती पे्रमादरे ॥२६॥ कोणी भेटीस येऊ लागले । कुणी औषधी देऊ लागले । प्रकृतीस पाहू लागले । प्रेमे वागले मजसवे ॥२७॥ श्यामला स्वप्नदृष्टांत झाला । बाबाच सांगती त्याला । ग्रंथ जातो पूर्णत्वाला । फिकीर कशाला करतोसी ॥२८॥ महादेवदासाचे आत्मनिवेदन । सर्वश्रेष्ठ भक्ती जाण । ग्रंथ होईल असामान्य । विचार अन्य नसावा ॥२९॥ भाकली नाथांची करुणा । देवा अखेर मी अर्धा-उणा । उगीच केला शहाणपणा । तुम्हाविना कुणा सांगू ॥३०॥ लगेच चमत्कार झाला । मंदिराहून अंगारा आला । लावला माक्या कपाळाला । औषधाला गुण येई ॥३१॥ आजार गेला पळून । परत मिळाले अवसान । हे नाथांचेच वरदान । ग्रंथलेखन पूर्ण केले ॥३२॥ शांतिमंदिर पुण्यधामी । जिथे बसले नाथस्वामी । येता वसंत पंचमी । पूर्णविरामी कार्य जाय ॥३३॥ धन्य धन्य महाराज । पावन केले मज आज । राखिली माझी लाज । आनंद सहज जाहला ॥३४॥ विद्या-विनय विभूषित । नाथभक्त श्रीकृष्ण राऊत । दिशा दाविली मजप्रत । ओतःप्रोत प्रेम दिले ॥३५॥ स्वप्नादेवी साकरकार । लावी कार्या हातभार । मज पडेना विसर । मान्यवर गोपाळराव ॥३६॥ चिरंजीव नाथ श्याम । न घेता विश्रांती आराम । रात्रंदिन हेच काम । अंतर मम साक्ष देई ॥३७॥ ग्रंथास देण्या आकार । झाले ज्यांचे उपकार । तयां करुनी नमस्कार । मनोगत सार संपवितो ॥३८॥

- महादेवदास,
मु.पो.हातरूण,
ता.बाळापूर जि.अकोला

0 comments:

आभार

प्रस्तुत ब्लॉगकरिता सौ.सरिता ढवळे,नाशिक ह्यांनीwww.nathbaba.org हे डोमेन रजिस्टर्ड करून दिले.त्या डोमेनवरही हा ब्लॉग उपलब्ध आहे.त्यांचे आभार,
LinkWithin Related Posts with Thumbnails

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP