गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११

गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ प्रसिद्ध झाला.जागतिक कीर्तिच्या प्रख्यात लेखिका शोभा डे,रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणार्‍या वर्षा उसगावकर यांच्यासह अनेक नामवंतांचा सहभाग असलेला हा अंक आहे. येथे *गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ * वाचा
*श्री नाथबाबा शांती मंदिर संस्थान,हातरुण ता.बाळापूर जि.अकोला_ सार्वजनिक न्यास नोंदणी क्र.ए-१६७३(अकोला)*
Related Posts with Thumbnails

श्री नाथ चरित्रछटा : सौ. वंदना चौधरी


ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्‌ ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षि भूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ॥
हातरूण ता़ बाळापूर, जि़ अकोला या पुण्यक्षेत्री इ़ स़ १९०० मध्ये पारसकर कुळात गणपतनाथांच्या घरात एक पुत्ररत्न जन्मले़. कोण्यातरी पुण्यात्म्याने आपले इप्सित पूर्ण करण्यास गुजाबाईच्या पवित्र कुशीत प्रवेश केला़ .हेच ते यादवनाथ़ .पारसकर कुटुंब हे नाथपंथी समाजातले़ नाथमार्गी परंपरेत वाढलेले़ योगसाधना हे नाथ पंथीयांचे जिवित कार्य़ नाथ संप्रदाय हा भारतातील फार पुरातन संप्रदाय समजल्या जातो़ याचे आद्यप्रवर्तक आदिनाथ शिव हे उपास्य दैवत़ मानवी शरीर हेच सर्वात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र असून गंगा-यमुना प्रयाग हे सर्व शरीरातच आहेत़ शरीरातील सहस्त्रार चक्रात शिवाचे व मूलाधार चक्रात शक्तीचे वास्तव्य असते़ शक्ति सर्पिणीच्या रूपात साडेतीन वेढ्यांची बैठक मारून बसली आहे़ तिला जागृत करून तिचे शिवाशी मीलन होणे म्हणजेच मोक्ष़ यासाठी करावी लागणारी साधना तोच योगमार्ग़ ह्याची प्राप्ती म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्ती़ तेच कैवल्य़
या ब्रह्मज्ञानाचा भूलोकी सुकाळ करण्यासाठी शिवाने अनेक नाथांच्या रूपाने अवतार घेतले़ त्यापैकी पहिला अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ़ ह्यांनी कौल साधना करून आपले कार्य केले पण त्यांचे जीवन भोगव्याप्त राहिले़ पुढे गोरखनाथ अवतरले़ त्यांनी योगमार्गाला फार व्यवस्थित रूप दिले़ पारमार्थिक जीवनाला शुद्ध वळण लावले़ पूर्वीपासून कौलमार्ग व कापलिक पंथ असे दोन प्रमुख विचार प्रवाह सुरू होते़ पण गोरखनाथांनी हठयोगाला उचलून धरिले़ कुंडलिनीच्या उद्बोधनाने हठात मोक्षाचे द्वार उघडले जाते अशी यांची भूमिका होती़ ह=सूर्य हा प्राणवायू सूचित करतो व ठ = चंद्र हा अपान वायु सूचित करतो़ सूर्य म्हणजे पिंगळा (उजवी नाडी) व चंद्र म्हणजे इडा़ शुक्र, वायु व मन, यातील शुक्र मुख्य, ह्याची गती अधोमुखी असते़ ती उर्ध्वमुखी केल्याने अमरत्वप्राप्ती होते़ हा शुक्र म्हणजेच सूर्य, कालाग्नी़ हीच शक्ती़
नाथपंथ हा द्वैतविलक्षणवादी समजल्या जातो़ सत्य हे द्वैत व अद्वैताच्या पलीकडे आहे अशी याची धारणा आहे़ शिवशक्तीचे सामस्यरूप असलेली सहज समाधी हाच खरा मोक्ष, असा या पंथाचा सिद्धांत आहे़ ना - अनादी रूप व थ - भूवनत्रयी स्थिती़ भूवनत्रयाच्या स्थितीला आधारभूत असलेला अनादी धर्म म्हणजे नाथ असे ह्यांचे मत आहे़ या धर्मप्रसारासाठी नऊनाथांनी अवतार रूपाने कार्य केले़ हीच परंपरा पुढे चालून निवृत्ती-ज्ञानेश्र्वरापर्यंत येऊन भिडली़ अगदी आलकडे आर्वीच्या मायबाई, राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगे बाबा आदि वंदनीय संतांनी या मार्गाने जाऊन अमृतपदाचा मान मिळविला़
अशा परमपवित्र नाथकुळात यादवनाथांनी जन्म घेऊन हातरूण क्षेत्र व पारसकर कुळ पावन केले़ स्वतः ज्ञानवंत होऊन हजारोना प्रकाशाची वाट दाखविली़ संतपणाच्या भूषणांनी सारा परिसर लखलखीत केला़ यादवनाथांच्या घरची स्थिती अत्यंत श्रीमंतीची व वैभवाची होती़ १२० एकर शेती व ३०० तोळ्यांच्या सुवर्ण संचयाचे ते धनी होते़ त्यामुळे राहणी सहजच मोठी थाटामाटाची असायची़ सोन्याचा भाव १८ रु़ तोळा असतांना ६० रू़ तोळ्याचे अत्तर ते वापरीत़ मुलालाही त्या अत्तरी पाण्यानेच आंघोळ घालीत़ नेसायला १०८ रू़ ची रेशीमकाठी धोतरजोडी व अंगावर घालायला मूल्यवान असे कोट जाकीट असायचे़ मनगटाला घड्याळ व डोक्याला इटालियन टोपी, असा नटासारखा वेष ते परीधान करीत़ परंतू पुढे पुढे त्यांना या उपाधीचा वीट येऊ लागला़ स्वातंत्र्य चळवळीनंतर त्यांनी शुद्ध खादीचे कपडे वापरण्यास सुरुवात केली़ त्यांचा विवाह तत्कालीन रूढीप्रमाणे वयाच्या ५व्या वर्षीच झाला़ पत्नीचे नांव गंगुबाई़ वधूचे वय त्यावेळी अवघे अडीच वर्षांचे होते़ त्याही पळसोद येथील अत्यंत सधन घराण्यातील़
गडगंज धन असूनही मन शुद्ध ठेवणारा माणूस विरळाच़ संपत्तीच्या नशेने भलेभलेही भुलतात़ तिच्या मदाने उन्मत्त होतात़ स्वतःच्याच विलासात दंग राहतात़ इतरांना तुच्छ लेखतात़ परतु संपत्ती ही ईश्वराची देणगी आहे; तिचा इतरजनांच्या अडचणी निवारण्यास उपयोग करावा अशी धारणा असणारेही काही महाभाग जगात असतातच़ त्यापैकी एक होते श्री यादवनाथ़ लक्ष्मीच्या मोहाला ते कधी बळी तर पडले नाहीच पण स्वतः जवळची पै अन्‌ पै अखेरपर्यंत लोकांसाठीच खर्च केली़ जनात जनार्दन आहे या भावनेने त्यांनी घरच्या लक्ष्मीला जनतेच्या कामात राबवली़ कर्णाच्या उदारतेने जवळची सर्व पुंजी परदुःख निवारण्यास खर्च केली़ शेवटी स्वतः अक्षरशः कफल्लक झाले़ बाबांनी अनेकांना पैसे द्यावे, लोकांनी न्यावे परंतु परत न करावे, हाच उद्योग आयुष्यभर चालत राहिला़ शेवटी तर घरातील मालमत्ता संपल्यावर त्यांच्या साध्वी पत्नीने माहेरचे काही सोने नाणे आणून संसाराचा गाडा कसातरी रेटला़ पण त्या माउलीने बाबांना ह्याची कधी वार्ताही लागू दिली नाही़ ज्याने सत्याचे व्रत अंगीकारले आहे त्याला संसारात असंख्य दुःखे सहन करावी लागतात़ सत्यपालन हे एक आसधाराव्रत आहे़ दया, क्षमा, शांती हे परमेश्र्वरी अंश खरे पण सत्य हे साक्षात परमेश्र्वरच आहे़ गांधीजी सारखे महात्मे सत्यालाच परमेश्वर मानीत़ भगवंताच्या उत्कट भक्तीने अंतःकरण तुडुंब भरल्याशिवाय कठोर सत्यपालन होत नाही़ स्वहिताच्या वेळी कोणीही सत्याचा उदोउदो करील पण स्वतःची हानी उघड दिसत असतांनाही सत्याला न सोडणे हे काम महाभाग सत्‌पुरुषांचेच़ बाबा अशाच महापुरुषांपैकी एक होते़
त्यांच्या अशा सत्यवादीपणामुळे किरकोळ व्यवहारात तर कितीतरी वेळा त्यांचे आर्थिक नुकसान झाले़ ते त्यांनी मोठ्या आनंदाने सहन केले़ परंतू आपल्या व्रताशी प्रतारणा केली नाही़ घरात अठराविश्र्वे दारिद्र्य आले असताही आपल्या शब्दाला कधी खोट लागू दिली नाही़ कधी कोणाला पैचीही मदत हात पसरून मागितली नाही़
भविष्य कथना बरोबरच बाबांना वैद्यकीय ज्ञान व नाडी परीक्षाही अचूक साधलेली होती़ जन्मकुंडली मांडण्यात तर त्यांचा हातखंडा होता़ यातही त्यांच्या निःस्पृह व परोपकारी वृत्तीचेच दर्शन लोकांना घडत असे़ त्यामुळे लोक त्यांचेकडे अत्यंत पूज्य भावनेने पाहत़ त्यांना आपला परम हितकर्ता व मार्गदर्शक समजत़ कारण या ज्ञानाच्या बळावर बाबांनी कधीच कुणाला नाडले नाही़ कोणाजवळून मोबदल्याची अपेक्षा केली नाही़ ज्ञानाचा व्यापार कधी केला नाही़.
बाबा जरी योगाभ्यासी व ईश्वरभक्ती करणारे होते तरी ते चालू काळाच्या ओघाबाहेर वागले नाहीत़ समाजस्थिती व देशस्थितीकडे कधी त्यांनी पाठ फिरविली नाही़ दारुच्या गुत्त्यावर, फटाक्यांच्या दुकानांवर पिकेटिंग करून त्यांनी आपली समाजाभिमुखता प्रगट केली़ स्वदेशी चळवळी व पुढारी यांचेवर स्तुतीवर कवने करून जनजागरणाचे कार्य केले़ गडी माणसापासून तो शेठ धनिकापर्यंत ते समादरानेच वागत़ उलट इतरांनी त्यांना मोठेपणा दिला तर स्वतः मात्र त्यांचा जीव कानकोंडा होई़ मान सन्मान घेण्यास ते नेहमीच नाखूष असत़ कोण्याही जीवाला दुखविणे त्यांना आवडत नसे़ साधी मुंगी दूर लोटतांना सुद्धा ते डोक्यातील टोपीने हळूवार दूर लोटीत़ कुत्रे व गाई हे प्राणी तर त्यांचे फारच आवडते साथी होते़ जेवत असतांना चारपाच कुत्रे त्यांच्या ताटाभोवती नेहमीच बसलेले असायचे़ त्यातील एखादा तर त्यांच्या बरोबर त्याच ताटात भोजन उरकायचा पण त्यांनी त्याला कधी हाट केले नाही़ ते झोपले असतांना देखील त्यांच्या बिछान्याभोवती गाई बसलेल्या असायच्या़ प्राणीमात्रावर दया करणे, सर्वाठायी समभाव ठेवणे, जनता जनार्दनाची निरीच्छ वृत्तीने सेवा करणे, ही संतपणाची लक्षणे बाबांचे ठाई पुरेपूर दिसून येत़ निष्काम कर्मयोग त्यांनी अखंडपणे आचरिला़ रावाचे रंक होऊनही आचरणात फरक होऊ दिला नाही़ आपल्या व्रतापासून ढळले नाहीत़ सुख-दुःख, शीत-उष्ण हे द्वैतच त्यांनी उरु दिले नाही़.
नरदेहाची प्राप्ती आत दुर्लभ समजल्या जाते़ हा मनुष्यदेह मलमुत्राचे जरी आगर असला तरी तो मोक्षाचे जागर सुद्धा आहे़ कारण या देहाशिवाय मानवाला परमेश्र्वर आढळून आत्मज्ञान मिळविता यायचे नाही़ गृहसंसार करायला कोणाचीच मनाई नाही परंतु केवळ वैयक्तिक प्रपंचातच गुरफटून आयुष्य वाया घालवू नये यावर मात्र त्यांचा कटाक्ष आहे़ मिळाल्या जन्मातच परमार्थ साधावा असेच ते आग्रहाने सांगतात़ परमार्थ साधण्यासाठी कोणते तरी जप, तप, अनुष्ठान केले पाहिजे, संसाराचा त्याग केला पाहिजे अशी काही लोकांनी उगीचच कल्पना केलेली असते़ प्रपंच व परमार्थ यांचे जणू वाकडेच आहे अशी त्यांची धारणा असते़ परंतु प्रपंच करूनही परमार्थ साधता येतो, याची देही याची डोळा परमेश्र्वर पाहता येतो; हे नाथांनी मात्र स्वानुभवाने सिद्ध करून दाखविले आहे़.
ब्रह्मज्ञान प्राप्तीचे, मोक्ष गाठण्याचे अनेक मार्ग वेद पुराणातून सांगितलेले आहेत़ ज्ञान, कर्म, भक्ती व योग हे त्यातील मुख्य मार्ग होत़ कोणत्याही मार्गाने गेले तरी नराला नारायणरूप होता येते़ परंतु कित्येक लोक विनाकारण आपल्याच मार्गाची शेखी मिरवितात़ इतर मार्ग तुच्छ लेखतात़ वास्तविक पाहता सर्व नद्या जशा समुद्राला मिळतात तसेच हे सर्व मार्ग एका परमेश्र्वरालाच पोहचतात़ श्रेष्ठ कनिष्ठ हा वाद व्यर्थ आहे़ वेदज्ञानी, योगाभ्यासी, वारकरी, असे भेद अनुचित आहेत़ मार्ग कोणताही चोखाळला तरी मुक्काम एकच गाठता येतो़ फक्त मनुष्य कोणत्यातरी मार्गी लागला म्हणजे बस्स ! नाथ वंशपरंपरेने योग मार्गी होते़ या मार्गाद्वारे यमनियमादि अष्टांगाच्या साधनाने कुंडलिनी जागृत करून आत्मस्वरूप अनुभवता येते़ परमात्म-रूपात लीन होता येते़ परंतु ही साधना साधकाला पुष्कळवेळा धोकादायक ठरते़ यासाठी त्याला सद्गुरूचे मार्गदर्शन आवश्यक असते़ केवळ ग्रंथ वाचून ग्रंथी सुटत नाहीत़ पण सद्गुरूला कोठे धुंडाळावेही लागत नाही़ यथासमय ते आपोआपच भेटतात़ यादवनाथांना सद्गुरू भेटले़ सस्ती-वाडेगांव (ता़ बाळापूर) येथील सुखदेवनाथ हे त्यांचे सद्गुरू ते अत्यंत ज्ञानी व योगी होते़ त्यांच्याकडे बाबा योग साधना व भक्ती शिकले़ आसने व प्राणायाम सहज लीलेने करू लागले़.
त्यानंतर त्यांनी आपली साधना अखंड चालू ठेवली़ रोज नेमाने पूजा केल्याशिवाय ते पाणी सुद्धा ग्रहण करीत नसत़ वयाच्या ३४-३५ व्या वर्षांपासून तर त्यांनी बोलणेच बंद करून टाकले़ त्यांनी पूर्ण मौन स्वीकारले ते अखेर १४ वर्षेपर्यत मोडले नाही़ फक्त रोज संध्याकाळी ते आपल्या पुत्राशी महादेवनाथाशी मोजून ५ मिनिटे बोलत़ तेवढ्या वेळात काही आध्यात्मिक उपदेश करीत़ काही धर्मवचनांचा अर्थ समजावून सांगत़ जणू ते आपल्या पुत्रास आपला आध्यात्मिक वारसदारच तयार करीत होते़ साधक योगसाधना करू लागला की योग्य काळानंतर त्याला काही सिद्धी आपोआपच प्राप्त होतात़ आपल्याला अमोल खजिना मिळाला असे साधकाला वाटू लागते़ ह्याच ठिकाणी साधक मार्गच्युत होण्याचा संभव असतो़ सिद्धिच्या मोहाला बळी पडून तो तेथेच रंगतो़ स्वतः त्यांच्या जाळ्यात अडकतो़ त्यामुळे पुढे त्याचा मार्ग खुंटतो़ अशावेळी साधकाला फार सावध रहावे लागते़ तसा तो राहिला म्हणजे शिखराच्या टोकावर आरूढ होतो़ मोक्षप्राप्तीचे पूर्ण यश त्याच्या हाती येते़ या साधनेमुळे जी एक प्रकारची आत्मिक शक्ति प्रज्वलित होते तिच्या बळावर योगी एरव्ही अशक्य वाटणार्‍या गोष्टी सुद्धा सहज शक्य करून दाखवू शकतो़ मुखावाटे बाहेर पडलेले शब्द प्रत्यक्ष होऊ लागतात़ त्याची वाणी देववाणी ठरू लागते़ नव्हे, असे घडणे म्हणजे सिद्धावस्थेचे लक्षण असते़.
बाबांच्या जीवनाचा प्रथमार्ध खूप श्रीमंती थाटात गेला़ घरात लक्ष्मी अक्षरशः हात जोडून उभी़ पण घरच्या लक्ष्मीची होळी करून बाबांनी इतरांची दिवाळी साजरी केली़ म्हणून उत्तरायुष्य मात्र अत्यंत दरिद्री अवस्थेत गेले़ मुलांनी बालपणी खाऊ म्हणून बदाम काजू खाल्ले त्याच घरी हरभरे खाऊन भूक शमविण्याचे दिवस आले़ परंतु या दोन्हीही स्थितीत त्यांच्या मनाची शांती कधीच ढळली नाही़ आचरण बदलले नाही़ शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान ही सारी द्वंद्वे पचवून बाबांचे अंतःकरण निस्तरंग राहिले़ सदा सर्वकाळ उन्मनी अवस्थेतच दंग राहिले़ मुंगीपासून माणसापर्यंत सर्वांठायी बाबांनी एक भगवंतच पाहिला सर्वांठायी प्रभूभाव हे बाबांनी आमरण आचरून दाखविले़ निरहंकारी नम्रपणा हे त्यांचे रोजचे वागणे़ कायिक, वाचिक व मानसिक असे त्रिविध तपाचरण त्यांच्या हातून सहजपणे घडले़ मुखातून हरिहर नामाशिवाय कधी दुसरे शब्द बाहेर पडले नाहीत़ हात कधी रिकामे राहिले नाहीत़ हृदय कधी जग-व्यवहाराने व्यापले नाही़ या अलौकिक खुणा आचरणात स्पष्टपणे उमटल्यावर संतपणा तो वेगळा कोठे असणार? सिद्धावस्थेची, शांती-लीन अवस्थेची अशी अमीट पावती प्रत्यक्ष वागणुकीने मिळाल्यावर योगीपणाची अन्य लक्षणे ती कोणती? वैराग्याच्या, निष्काम कर्मयोग्याच्या यापेक्षा दुसर्‍या कोणत्या कोटी म्हणता येतील?
ता़ २२/२/१९४९ रोजी त्यांनी आपल्या पुत्रास-महादेवास दिवसभर जवळ बसवून ठेवले आणि म्हणाले तू म्हणशील तर मी ३ महिने वाचतो, पण फारच त्रास होत आहे़ असे हे महान संतयोगी यादवनाथ बाबा इ़ स़ दि़ २३/२/१९४९ बुधवार रोजी माघ वद्य एकादशीस सायंकाळी ५-३० वाजता स्वस्वरूपी लीन झाले़ दुसरे दिवशी सर्व अंत्यसंस्कार एखाद्या संताच्या निर्वाण प्रसंगाप्रमाणे करण्यात आले़ रामनामाने आकाश दुमदुमून गेले़ हरिभजनाने वायुमंडळ व्याप्त झाले़ गावातील लहान थोर मंडळी साश्रु नयनांनी हा सोहळा पहात होती़ गावालगतच्या त्यांच्या शेतातच पार्थिव देहाला समाधी देण्यात आली़ तिच्यावर नंतर एक कडुनिंबाचे रोपटे आपोआपच उगवले़ शेख गुलाब नांवाच्या मुसलमान बंधूने ह्या रोपट्यास कुंपण घालून जगविले़ तेच झाड आज उत्तम फोफावले आहे़ त्याची पाने कडू न लागता गोड लागतात असा अनेक भक्त अनुभव घेत आहेत़ प्रसादवृक्ष समजून त्याला वंदन करीत आहेत़ तेथेच समाधीवर त्यांच्या सुपुत्राने-महादेवनाथाने एक रम्य शांतिमंदिर उभारले आहे़ अनेक श्रद्धावान भक्त तेथे रोज येतात व मनःशांतीचा प्रसाद सेवन करतात़ मानवी चक्षुंना गोचर नसले तरी बाबा आजही आहेतच़.
शांतीलीन योगी यादवनाथ बाबांच्या संतत्वमय चरित्राचे दर्शन आपण नुकतेच घेतले आहे़ त्यांच्या धर्मपत्नी पतिव्रता गंगुबाई दर चातुर्मासात पंढरीस जात़ यावर्षी त्यांचा तिसरा चातुर्मास होता़ पण कुशीत एक पुण्य जिवात्मा पूर्ण आकारीत झाल्यामुळे चातुर्मास पूर्ण न करताच त्या परत आल्या़ त्यांचे माहेर पळसोद गांव़ अत्यंत श्रीमंत स्थितीत नांदणारे़ प्रसुतीसाठी त्या आपल्या माहेरास गेल्या़ तिथेच त्यांनी ता़ २८-८-१९१८ बुधवारी गोकुळअष्टमीचा कृष्णजन्माचा सोहळा संपताच पहाटेच्या मंगलसमयी एका पुत्ररत्नास जन्म दिला़ पंढरीनाथाने आपल्या भक्ताचे मनोरथ पूर्ण केले़ ब्राह्मी मुहूर्तावर जणू निराकार ब्रह्मच आकारास आले़ शिवाने शक्तीत संचार केला़ उभे घर आनंदाने फुलून गेले़ सर्वांची तोंडे गोड झाली़ यथासमय या बालकाचा नामकरण विधी संपन्न होऊन युधिष्ठीर हे नांव ठेवण्यात आले़ हेच ते योगी महादेवनाथबाबा़ लोक पुढे त्याला महादेव नावाने संबोधु लागले़ घरची सांपत्तिक स्थिती फारच उत्तम़ उणीव कशाचीच नाही़ त्यामुळे महादेवाचे फार कोड-कौतुक होऊ लागले़ कडेवर सांभाळायला गड्याची नेमणूक झाली़ किंमती अत्तरजलाने आंघोळ होऊ लागली़ सोन्याचे अलंकार अंगावर खुलू लागले़ श्रीमंताचा लेक; त्यातून एकुलता एक; मग कसली बरे उणीव राहणार?
यथासमय मुलाचे नाव शाळेत घालण्यात आले़ प्राथमिक शिक्षणास सुरवात झाली़ महादेव क्रमाक्रमाने एक एक वर्ग उत्तीर्ण होऊ लागला़ चवथ्या वर्गाची परीक्षा तो उत्तम रितीने पास झाला़ पुढील शिक्षणास अकोल्यास पाठविण्यात आले़ तेथे १३ महिने राहूनही महादेवाचे लक्ष पुस्तकी शिक्षणात लागेना़ ते शाळेत न जाता इतरत्र भटकत़ कधी नदीकाठी, तर कधी जुन्या किल्ल्यावर असाच वेळ घालवित़ थोड्याच महिन्यात शाळेला रामराम ठोकून महादेव स्वगृही परत फिरला़.
शिक्षण काळातच महादेवाला अनेक मित्रमंडळी लाभली़ बाबुराव दहीकार हे तर त्याचे जिवलग मित्ऱ शाळेत जातांना दोन्ही खिसे नेहमी बदाम-पिस्त्यांनी भरून असायचे़ आखाडा-मल्लखांब ह्यांचा सुद्धा त्याला फार षौक़ मोर्णा नदीत पोहत राहणे हा त्याचा आवडता छंद़ परंतु महादेवाचे असे वैभवाचे दिवस फार काळ टिकले नाहीत़ ते बाराव्या वर्षात पदार्पण करते झाले अन्‌ लक्ष्मीने घरातून काढता पाय घेतला़ वडिलांच्या उदार व विरागी स्वभावामुळे घरची संपूर्ण १२० एकर शेती, पैसा अडका व सोने-नाणे खलास झाले़ सर्व कुटुंब निर्धऩ अक्षरशः अन्नान्न दशा झाली़ महादेवाचे मामकुळही अत्यंत श्रीमंत होते़ तेथून आईच्या नांवाने काही शेती मिळाली होती़ ती विकून हातरूणास १०-१२ एकर दुसरी शेती विकत घेतली़ महादेव आता घरची शेती करू लागला़ ४-५ वर्षे शेतीचा उद्योग करून कुटुंबाचा कसातरी खर्च भागविला पण पूर्णपणे उदरनिर्वाह होईना़ ही स्थिती पाहून श्रीकृष्ण सावजी नावाच्या एका सन्मित्राने जवळचे थोडे भांडवल गुंतवून सुपारीचे छोटेसे दुकान लावून दिले़ पण अल्प काळातच तेही बुडाले़.
कमाईत काहीतरी भर पडावी म्हणून दुसर्‍याकडे मजुरीने जावे, असे महादेवाच्या मनात आले़ एका शेतकर्‍याकडे ते १॥ आणा रोजाप्रमाणे मजुरीस गेले़ त्या शेतमालकाने त्याला तेवढ्याच मजुरीत ३ शेतावर काम करण्यास नेले़ महादेवाला हे मोठे विचित्र वाटले़ घरी आल्यावर त्याने विचार केला १॥ आण्यासाठी केवढी ही धावपळ व कष्ट ! आणि या एवढ्या १॥ आण्यात सर्व कुटुंबाचा खर्च तरी कसा भागणार ? छे ! काही तरी निराळा उद्योग केलाच पाहिजे़ वडिलांपासून शिवणकामाचे थोडेसे शिक्षण त्यांना मिळाले होतेच़ त्याचाच उपयोग करायचे त्याने ठरविले़ शिवाय महादेव मिस्त्री यांनी १२-१३ महिने शिक्षण देऊन महादेवाचे शिंपीकाम शिक्षण पूर्ण करून दिलेच होते़ तेवढ्या भांडवलावर शिंप्याचा व्यवसाय सुरू केला़ त्यात यथायोग्य यश मिळू लागले़ तीन मशिनी घरात खडखडू लागल्या़ तीन माणसे काम करू लागली़ महादेवाजवळून शिक्षण घेऊ लागली़ त्यातून ५-६ रूपयांची प्राप्ती रोज होऊ लागली़ घरखर्च व्यवस्थित भागू लागला़ सर्वांच्या मुखांत चार घास सुखाने पडू लागले़.
वयाच्या २२ व्या वषी महादेवाचा विवाह खडद्‌गांव येथील गोविंदनाथ चिलवंते यांची कन्या वत्सला हिच्याशी झाला़ त्यावेळी तिचे वय १६ वर्षांचे होते़.
महादेवांना ४-५ वर्षांनी लहान अशी एकच बहिण झाली़ तिचे नांव अंजनाबाई़ त्यांचाही विवाह चिंचोली (ता़. दर्यापूर) येथील श्री महादेवराव पाठक यांच्याशी करून देण्यात आला़.
इकडे घरात मात्र वडिलांची विरागी-अवस्था आधकच वाढत गेली़ ते मधून-मधून मौन धरू लागले़ इ़ स़ १९३४-३५ पासून पुढे १४ वर्षे तर त्यांनी पूर्णतः मौन धरले़ त्यामुळे आता संसाराचा सर्व भार महादेवावरच येऊन पडला़ पण ते डगमगले नाहीत़ वडिलाजवळून मिळालेला आध्यात्मिक वारसा कसोशीने सांभाळण्यासाठी त्यांनी कंबर कसली़ प्रापंचिक अडचणींना ते धैर्याने तोंड देऊ लागले़ वडिलांनी महादेवाच्या लहानपणातच आध्यात्मिक अभ्यासाची आवड पेरून ठेवली होती़ मानस-भूमि अगदी तयार करून ठेवली होती़ महादेव दुसर्‍या वर्गात असतांनाच ते त्याच्याकडून गीता, रामायणादि धार्मिक ग्रंथ वाचून घेत़ अभंग, पदे म्हणावयास लावीत़ पुढे पुढे आसनादिकांचे प्राथमिक धडेही गिरवून घेऊ लागले़.
महादेवाचे पारसकर कुळ हे नाथ-पंथी समाजातले़ त्यामुळे योगमार्गाची विद्या त्यांच्या रक्तातच भिनलेली़ अष्टांग-योग-साधना ही तर त्यांची परंपरागत पूजा़ परंतु कुलदैवत मात्र विठ्ठल-रुखमाई़ नाथ-पंथ हा शिवाचा उपासक़ शिव-शंभू हे या पंथाचे आदिनाथ़ एकदा शबरीच्या वेषात असलेल्या पार्वतीने प्रश्र्न केल्यावरून शिवाने नदी किनारी एकांतात ब्रह्म-ज्ञानाचे गूढ तिला सांगितले़ जवळच पाण्यात तरंगत असलेल्या मत्स्याने ते ऐकले़ ती ज्ञानप्राप्ती (पुढे साबरी विद्या म्हणून प्रसिद्ध पावलेली) घेऊनच एका दिव्य-कायेने मत्स्याच्या उदरांतून जन्म घेतला़ हेच ते मच्छिंद्रनाथ़ या पंथाचे आद्य प्रवर्तक़ हीच विद्या-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्ती-ज्ञानदेव आदि नाथ पंथीयांनी पुढे चालविली़ योग, वैराग्य व अद्वयानंद ही या पंथाची प्रधान लक्षणे आहेत़ या परंपरेचा अमोल ठेवा घेऊन महादेव आपला मार्ग आक्रमू लागले़ या कामी वडिलांचेही गुरूप्रमाणेच मार्गदर्शन त्यांना लाभले़ वडिलासारख्या संत व योगी पुरूषाच्या नित्य सहवास-दर्शनाने व बोधामृतामुळे योग-सोपानाची एक एक पायरी ते बिनधोकपणे चढू लागले़
रोज नेमाने धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे, वर्तमानपत्रे वाचावी, मित्रमंडळीशी काही काळ चर्चा करावी, कोणाची कुंडली तयार करून द्यावी, कोठे पोथी वाचन तर कोठे जप करावा, अशी त्यांची दिनचर्या ठरलेली असायची़ त्याचप्रमाणे गावातील इतर गोष्टी मध्येही ते लक्ष घालू लागले़ धार्मिक व सामाजिक कार्यातही सहभाग देऊ लागले़
सन १९४१-४२ सालची घटना हातरूण गांवच्या परिसरात अवर्षणाने भितीग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती़ सर्व लोक आकाशाकडे डोळे लावून रोज वरुणराजाची करुणा भाकीत़ पण पावसाचे टिपूस नाही दिसायचे़ काय करावे कोणालाच काही सुचेना़ शेवटी महादेवनाथाचे जावई श्री पाठक यांनी गावकर्‍यांच्या मदतीने यज्ञ करण्याचा घाट घातला़ यज्ञकर्माचे कंकण महादेवनाथांच्या हाती बांधले़ यज्ञविधी यथासांग पार पाडला़ त्यांनी लोकेच्छेचा आदर केला़. परंतु ते रूढीवादी वा कर्मकांडी नव्हते़ तुकडोजी महाराजांची भजने ऐकण्याचे बाबांना आतशय वेड होते़ बातमी कळली की कितीही दूरच्या ठिकाणी ते भजनास न चुकता हजर राहत़ तो एक छंदच त्यांनी जडवून घेतला होता़ एक प्रसंग ते स्वतः सांगत़ द्यद्यजवळपास कोण्याही गावी महाराजांचे भजन असले की मी तेथे नेमाने जात असे़ आसपासचे कुठलेही भजन मी चुकविले नाही़ त्यांच्या खंजरीचे बोल व आभनव भजन चाली यांची तर मोहिनी होतीच पण मला विशेष आकर्षण वाटायचे त्यांच्या मुद्रेचे़ दूर उभा राहून मी त्यांच्या सतेज मुद्रेकडे टक लावून पाहत राहायचा़ अगदी भजन संपेपर्यंत निव्वळ उभाच़ त्यांची दृष्टी दुरवर कशात तरी खूप तल्लीन झालेली आहे, असे वाटायचे ती मुद्रा पाहूऩ या वेडापायी २१ वेळा त्यांचे भजनाचे कार्यक्रम मी ऐकले़ त्याकाळी मी भगवी टोपी घालीत असे़ २२ व्या वेळी जवळच अंदूरा गावी त्यांचे भजन होते़ नित्याप्रमाणे मी हजर झालो़ कार्यक्रम संपला़ महाराज कोणाला तरी बोलले त्या भगव्या टोपीवाल्यास इकडे बोलवा़ मला आज्ञा कळली़ मी समोर गेलो़ त्यांनी प्रेमाने विचारपूस केली आणि हळूच म्हणाले, द्यद्यकशाला असा फिरतोस? घरीच बसला राहा.घरी तर मी सदाच बसला असतो (शिंपी कामात बसावेच लागते) मी नम्रतेने सांगितले़.
द्यद्यआता आधक बस, जा किंचित हसून ते म्हणाले़ त्याच वेळेस आमच्या गावाला भजनाचा कार्यक्रम देण्याचे त्यांनी मान्य केले़ नंतर १९४२ साली तसा योग जुळून आला़ सार्‍या गावकरी बंधुंनी आतशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला़ सारा परिसर धन्य झाला़.
गावातील इतर छोट्या-मोठ्या कार्यातही बाबा आता पुढाकार घेऊ लागले़ १९४७ सालचा १५ ऑगस्टचा पहिला स्वातंत्र्य दिनोत्सव़ होता़ हातरूणला मुसलमान बंधूंची संख्या जास्त़ ४-५ दिवसांपासून गावात हिंदू-मुसलमानात वितुष्टाचे वारे वाहू लागले होते़ ही गोष्ट महादेवनाथाचे कानावर जाताच त्यांनी ता़ ११-८-१९४७ ला दोन्ही जमातीतील काही प्रमुख लोकांची एक सभा घेतली़ तीत स्वतः छोटेसे भाषण केले़ परिणाम असा झाला की दोन्ही जमातीमध्ये दिलजमाई होऊन शंकाकुशंकाचे शेवाळ वाहून गेले़ १५ ऑगस्टचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला़ त्याचप्रमाणे मधून-मधून ते गावातील इतर काही लहान मोठ्या सभातही सामील होऊन चार शब्द बोलत असत़ कधी शिक्षकांशी चर्चा करून त्यांच्या सभेतही आपले विचार मांडीत़ १९४८ साली गांधीजींचे निर्वाणानंतर झालेल्या दुखवट्याच्या सभेतही भाषण करून त्यांनी आपली राष्ट्रनिष्ठा व्यक्त केली़ जातीपातीचा विधी निषेध तर त्यांनी कधीच पाळला नाही़ त्याबद्दल गांवातील काही सोवळ्या लोकांनी त्यांना हिणवलेसुद्धा़ पण त्यांनी त्यांची पर्वा केली नाही़ ता़ १८-३-१९४९ ला एका मातंग बंधूच्या हस्ते शाळेत चहापानाचा कार्यक्रम घडवून आणला़ त्याप्रसंगी त्यांच्या व्यतिरिक्त, सर्वश्री सरोदे, वडतकर, कापसे, नामदेव कोळी, पोटे, इनामतखां अशी मित्रमंडळी हजर होती़ तसेच १२-४-१९४९ रोजी एका हरिजन बंधूच्या विनंतीवरून जाऊन त्यांनी भागवत वाचन केले़ तेथेच चहापान करून गोमांस भक्षण व समाजसुधारण याबाबत छोटेसे भाषणही केले़.
अशा तर्‍हेने विविध कार्ये पार पाडीत पाडीत सन १९४९ पर्यंत महादेवनाथाने आपल्या आयुष्याची वाटचाल केली आणि १९४९ सालचा फेब्रुवारी महिना उजाडला़ २३ तारखेस बुधवारी सायंकाळी वडील इहलोकाचे नाते सोडून गेले़ महादेवनाथाच्या डोक्यावरील कृपाछत्र नाहीसे झाले़ आयुष्यातील एका चिरस्मरणीय कल्याणकारी पर्वाची इतिश्री झाली़.
वडिलांचा अंत्यविधी यथासांग पार पाडून महादेवनाथांनी आपले लक्ष योगाभ्यासात व कुटुंब पोषणात केंद्रीत करण्याचे प्रयत्न चालू केले़ थोडीसी स्थिरता येते न येते तोच १९५०-५१ साली त्यांचे जिवलग मित्र महादेव कांगोलकार व नामदेव दहीकार हेही त्यांना सोडून गेले़ एखाद्या थोरल्या वृक्षाची एक एक शाखा झडून पडावी व तो वृक्ष निष्पर्ण, भकास दिसू लागावा तशी महादेवनाथाच्या मनाची स्थिती झाली़ जबाबदारी म्हणून ते कौटुंबिक कामे करीतच पण मनांत मात्र अहर्निश तीव्र उदासी भरलेली असायची़ हृदय नेहमी कोणत्या तरी खोल अनामिक भितीने व्याप्त़ मन सदासर्वकाळ खिन्ऩ कोणी दिवा दाखविणारा नाही, की कोणी वाटाड्या नाही़ मन धड संसारात लागेना व परमार्थातही चिकटेना़ केवळ देह मात्र विहित कर्मे करायचा़ जिवाला कशाची तरी एकसारखी तळमळ लागलेली असायची़ आंत कोठेतरी तीव्र वेदना, अखंड टोचणी़ पण कशाची? काही उमज नाही़ अशा अशांत अवस्थेत वडिलाची तीव्रतेने आठवण येऊ लागली़ शेतातील त्यांच्या समाधीजवळ ते येऊन बसू लागले तेथे मात्र त्यांच्या मनाला थोडा विरंगुळा वाटू लागला़.
मनाला शांती मिळत आहेसे पाहून तेथेच येऊन बसण्याचा क्रम त्यांनी सतत चालू ठेवला़ मन अशांत झाले, भयव्याप्त झाले की, वडिलांच्या समाधीजवळ येऊन बसावे असाच परिपाठ आता सुरू केला़ पुढे त्याच ठिकाणी कधी तुकारामाची अभंग गाथा वाचावी; कधी गीतेचे श्लोक आठवावे; कधी वडिलांच्या बोध-वाणीचे स्मरण चिंतन करावे, असा नित्यक्रम ठरून गेला़ १९५४ पर्यंतचा म्हणजे ५ वर्षाचा काळ महादेवनाथांनी अशाच अस्वस्थ अवस्थेत घालविला़ त्याबद्दल ते म्हणतात - याच ठिकाणी बसून मी मनःशांती मिळवू शकलो़ आज जे येथे दिसत (मंदिर वगैरे) आहे, त्या सर्वांची निर्मिती एका शुन्यातून आहे, त्या महात्म्याच्या शक्तीचाच हा प्रभाव आहे़ तोच सारे करून घेत आहेद्गद्ग या ठिकाणी सर्व संकल्प फलद्रुप होतात़ कोणतीही इच्छा पूर्ण होते़ अशांत मने शांत होतात़ अस्वस्थ अंतःकरण स्वस्थ होते़ भांबावलेली बुद्धी स्थीर होते़ अंधारातून मार्ग सापडतो़ भटकल्या जिवांना दिशा कळते़ अशी ही कल्पभूमि आहे़ मला प्रचीती आली, कोणासही येईल़.
हातरूणचे श्री सुखदेव सरोदे हे महादेवनाथांचे परमस्नेही़ त्यांच्याकडे नाथांचे नेहमी जाणेयेणे असायचे़ बाळापूर जवळील कुपटा गांवचे श्री नामदेवराव भाजीपाले हे श्री सरोदे यांचे बहीण जावई़ त्यामुळे ते नेहमी हातरूणास येत़ परिपूर्ण योगाभ्यासी म्हणून त्यांची ख्याती महादेवनाथांच्याही कानावर होतीच़ रस्त्याने जाता येतांना अनेकदा त्यांना पाहिले होते़ पण प्रत्यक्ष भेटीचा योग मात्र आला नव्हता़ १९५४ साली एक दिवस भाग्याचा ठरला़ श्री भाजीपाले महाराज श्री सरोदेकडे आले होते़ महादेवनाथांना ही बातमी समजली़ स्वभावतःच त्यांना आध्यात्मिक धार्मिक गोष्टी ऐकण्याची आवड़ तेही महाराजांच्या भेटीस श्री सरोदे यांच्या घरी गेले़ योगायोगाने श्री सरोदे कडील कोणीच घरात नव्हते़ श्री महाराज व महादेवनाथ यांना अनायासेच एकांत मिळाला़ साधकाची तयारी त्याच्या चेहर्‍यावरूनच ज्ञानी लोक ओळखतात म्हणतात़ नाथांचा चेहरा पाहिल्याबरोबरच श्री महाराज उद्‌गारले खाता पण पचत नाही नाथांना यातील काहीच बोध होईना़ खाणे काय व पचणे काय यांचा काही संबंधच लक्षात येईना़ पण अंतरीचे भाव मात्र अकस्मात जागृत झाले़ त्यांनी महाराजांच्या चरणांवर एकदम डोके ठेऊन विचारले़ खाणे व पचणे, आपण काय म्हणत आहांत, मला आज स्पष्ट अर्थ करून सांगा़ त्याशिवाय मी हे पाय सोडणार नाही.
चला आत महाराज म्हणाले़ नाथांना आतल्या खोलीत नेले़ सर्व अर्थ स्पष्ट करून सांगितला, आणि पुढील अभ्यास म्हणून द्यनवलीचीद्ग क्रिया सांगितली़ द्यखाणे व पचणेद्ग यांचा संबंध योगसाधनेशी आहे, हे नाथांच्या नंतर ध्यानात आले़ अशातर्‍हेने नाथांना अचानकपणे पारमार्थिक सद्गुरूचा लाभ झाला़ सद्गुरू धुंडावे लागत नाहीत, आपली तयारी जाणून ते आपोआप दर्शन देतात, हे पूर्वसुरीचे वचन सत्यसृष्टीत उतरले़ या पुढील सुमारे पाच वर्षाचा काळ कठोर तपस्येचा ठरल्या गेला़ सद्गुरू माउलीने शिष्याकरवी साधनेची परिपूर्णता करवून घेतली़ सद्गुरू भाजीपाले महाराज हे बर्‍हाणपूर येथील डॉ़ गेंदालाल बाबा यांचे सत्‌शिष्य़ संसारी असूनही योगशास्त्रात पारंगत होते़ पुढे थोड्याच दिवसांनी नाथ सद्गुरूंच्या कुपटा या गावी भेटी निमित्त गेले़ गुरू महाराज घरी होतेच़ त्यांनी नाथांचे योग्य ते आदरातिथ्य करून त्यांना ठेवून घेतले़ गुरूपत्नीने स्वतः नाथांना आंघोळ घातली़ पूजा-अर्चेची सिद्धता करून दिली़ पूजाविधी आटोपल्यावर गुरूंनी नाथांना आसनावर बसविले़ त्यांच्या समोर उभे राहून म्हणाले द्यद्यमला पूर्णपणे पहा़ पायापासून डोक्यापर्यंत़ एका दृष्टीतद्गद्ग महादेवनाथांनी आज्ञेप्रमाणे केले़ गुरूंनी मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला़ द्यओम नमः शिवायद्ग हा मंत्र सांगून पाहुणचार करून शिष्याची रवानगी केली़.
नाथ स्वगृही परतले़ दृढभावे साधना करू लागले़ पूर्वीची पुष्कळशी तयारी होतीच़ त्यामुळे साधनेच्या सर्व क्रिया दृतगतीने होऊ लागल्या़ पायरी पायरीने वर चढू लागले़ आत्मिक आंनद देणारे अनुभव-क्षण गर्दी करू लागले़ ज्ञानाचे क्षेत्र विस्तार पावू लागले़ गुरूबोधाने काजळी झाडल्यामुळे आत्मदीपाची ज्योत आता आधक प्रकाशमान दिसू लागली़ योगसाधनेच्या मार्गावर पदोपदी अडचणीचे काटे पसरलेले असतात़ संकटाचे खाचखळगे विखुरलेले असतात़ स्वतःच्या कल्पनेप्रमाणे कोणी हा अभ्यास करतो म्हटले तर मोठाच धोका निर्माण व्हायचा़ म्हणून सद्गुरूच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीच हा अभ्यास करण्यात सुरक्षितपणा असतो़ महादेवनाथही सद्गुरूच्या पुनर्भेटीसाठी तळमळू लागले़ पुढील मार्गदर्शनाची काकुळतीने प्रतिक्षा करू लागले़ परंतु कित्येक दिवसपर्यंत सद्गुरूचे पाय इकडे वळले नाहीत़ तरीही नाथ काही थांबले नाहीत़ प्रकाशित झालेल्या ज्ञान-ज्योतीला आवश्रांत साधनेचे तेल मिळू लागल्यामुळे ती आता दिव्य तेज धरू लागली़ प्रकाशाचे वलय वाढू लागले़ एक दिवस स्फुरण झाले, द्यआपण नागझरीस जावेद्ग नागझरी हे क्षेत्र शेगाव जवळ असून ते श्री गोमाजी महाराजांचे समाधीस्थळ म्हणून विख्यात आहे़ नाथ तेथे गेले़ कोणी तरी तेथे द्यभागवतावरद्ग प्रवचन करीत होते़ नाथ जाताक्षणीच प्रवचनकाराचे शब्द त्यांच्या कानावर पडले, द्यद्यसंसार ओल्या नारळासारखा आहेद्गद्ग नाथांच्या अंतर्मनाने ग्वाही दिली़ गुरूकृपेनेच हा बोधयोग साधला असावा़ ते शब्द हृदयसंपुटात साठवून घेऊन नाथ परतले, नेहमीचे कार्यात दंग झाले़.
पुढील दोन-अडीच वर्षे तर ते साधनेच्या उच्चतर अवस्थेतच मग्न राहू लागले़ बाहेर जाणे, बोलणे, जवळ जवळ बंदच़ रात्रंदिवस खाटेवर डोळे मिटून पडून असायचे़ झोप मुळीच नाही़ पाहणाराला फक्त पापण्या मिटलेल्या दिसायच्या़ मनात मात्र ईश्र्वर नामाचा अखंड जप सुरू़ ही त्यांची स्थिती पाहून लोक द्यहा वेडा झाला, पिसा झालाद्ग असे म्हणू लागले़ पण नाथांचे कोठे होते तिकडे लक्ष ? त्यांचे अंतःकरण तर आत्मदर्शनासाठी सारखे तळमळत होते़ इतर लौकिक व्यवहाराचे भान अशावेळी कसे असणार ? तशातच त्यांना उचक्याही सपाटून लागत़ लागलेली उचकी काही केल्या शमेना़ उचकी सुरू झाली की प्राणांतिक वेदना होत, परंतु द्यरामनामद्ग घेणे सुरू केले की उचकी थांबायची़ रामनाम बंद की पुन्हा उचकी सुरू़.
या काळातच कित्येक महिने ते देहभानावर नसत़ घरात जे घडत असे ते त्यांच्या गावीही नव्हते़ एक दिवस त्यांचा एक दीड वर्षाचा श्याम नावाचा मुलगा वारला़ नाथ तर इकडे जप-ध्यानात मग्ऩ त्यांना सांगावे कसे ? पत्नीने व इतर मंडळीनेच त्या मुलाचा अंत्यविधी आटोपून टाकला़ नाथांना पत्ताच नाही़ दोन-तीन महिन्या नंतर नाथांनी एक दिवस श्याम ला हाक मारली़ पण द्यओद्ग कोण देणार ? पत्नीने मोठ्या धीराने सर्व वर्तमान सांगितले़ पण नाथ दुःखी झाले ? छे ! तिलाच धीर देऊन म्हणाले़ द्यद्यकाही हरकत नाही़ हळहळ करू नकोस़ लवकरच श्याम पुन्हा आपल्या घरात येईल आणि नाथांचे शब्द खरे झाले़ एक दीड वर्षाने घरी एक मूल जन्माला आले़ अगदी प्रथमच्या श्याम सारखेच़ म्हणून त्याचेही नांव श्याम ठेवण्यात आले़ फक्त उजव्या डोळ्यांत किचिंत फरक वाटायचा़ पहिल्या श्यामचा उजवा डोळा थोडा बारीक होता तर याचा पूर्ण़ पुढे काही महिन्यांनी मुलाचे डोळे आलेत़ तेव्हा नाथ म्हणाले द्यद्यअरे याच्या उजव्या डोळ्यात थोडा फरक दिसतोद्गद्ग डोळे तर बरे झालेत पण श्यामचा उजवा डोळा मात्र बारीकच राहिला़ संपूर्णतः पहिल्या श्याम सारखाच़.
हा साधना-काळच साधकास अत्यंत कष्टदायक असतो़ नाना-प्रकारचे क्लेष, दुःख, अडचणी, साधकाचा मार्ग अडवून धरतात़ मोहक सिद्धीचे जाळे विणल्या जाते़ लोकेष्णा मूळ धरू लागते़ चमत्कार तृष्णेची खळबळ सुरू होते, मोठेपणाचे पंख फडफडू लागतात़ फल प्राप्तीचे आभास डोळे मिचकावू लागतात़ मानमान्यतेचा पारा वर चढू पाहतो़ जणू त्या साधकाची कठोर परीक्षाच सुरू असते ! येथे सावध राहतो तोच तरतो़ या सर्वावर मात करून जो साधक परीक्षा पार करतो तोच सिद्ध होतो़ नाही तर, येरे माक्या मागल्या ! बहुतेक साधक येथेच अडतात, घसरतात, पडतात़ नाथांनाही या काळात अत्यंत क्लेष, कष्ट सहन करून कठोर परिश्रम करावे लागले़ कित्येक वर्षे त्यांनी हातांवर भाकरी घेऊनच कोठेही बसून जेवण केले़ शेंगदाणे व गाजरे येवढाच आहार कितीतरी महिने सुरू ठेवला़ झोप मुळीच नाही़ अंगात इतका दाह वाढला की, सर्व शरीर पेटते आहे की काय असेच वाटायचे़ शरीरात इतकी भयंकर उष्णता वाटायची की, एका जागी बसणे किंवा पाय ठेवणेसुद्धा सहन व्हायचे नाही़ रात्रंदिवस सारखे तळमळत काढावे लागत़ थोडे थंड वाटावे म्हणून छातीवर सतत ओल्या कपड्यांचे गुंडाळे ठेवावे लागत़ तरीही आराम वाटेना़ शेवटी अंगणात एक खड्डा खोदण्यात आला़ त्यात थंड पाणी भरून त्यातच नाथ कित्येक दिवस पडून असायचे़ घंगाळात थंड पाणी घेऊन त्यात तासन तास पाय बुडवून ठेवायचे़.
अशा खडतर आचरणात महिन्यामागून महिने जात होते़ साधनेची पूर्णावस्था जवळ येऊ पाहत होती़ फळ दिसू लागले होते़ योगाभ्यासातील सर्व पायर्‍या ओलांडल्यासारख्याच होत्या़ त्यामुळे उच्च अवस्था गाठल्याच्या काही खुणाही प्रत्यक्ष आचरणात उमटत होत्या़ अशा तर्‍हेने साधना पूर्ण होत आली़ अंधारातून प्रकाशकिरणे दिसू लागली़ इप्सित ध्येय हाती गवसले़ यौगिक परीक्षा पार पडल्या़ निकाल म्हणूनच की काय, काही दृष्टांत साक्षात्कार घडू लागले़.
मनास अंमळ स्थिरता वाटली म्हणजे मधून मधून ते शेतात जात़ शेतातील कामे स्वहाताने करीत़ आहार फक्त शेंगदाणे, गाजरे व बेसन भाकरी़ योगसाधनेत द्यभूचरीद्ग़ मुद्रा (सतत अधोदृष्टी) म्हणून एक अभ्यास आहे़ साधनेच्या विवक्षित अवस्थेत ही मुद्रा करणे अत्यंत आवश्यक समजल्या जाते़ ही मुद्रा करायची असली म्हणजे नाथ शेतात जात़ पर्‍हाटी उपटण्याचे अगर वेचण्याचे काम करीत़ म्हणजे काही होई व मुद्राही साधल्या जाई़ हाती काम मुखी राम़ कार्यालाच साधना बनविण्याची हातोटी़ याप्रमाणे विविध तर्‍हेच्या साधनेचा ४-५ वर्षाचा काळ संपत आला़ परंतु सद्‌गुरूने मात्र मुळीच दर्शन दिले नाही़ नाथांच्या मनाला भेटीची एकसारखी तळमळ लागलेली़ जीव व्याकुळलेला़ एक दिवस रात्री ८-९ च्या सुमारास गुरूमहाराज घरी नाथासमोर अकस्मात येऊन उभे ठाकले़ नाथांना अपरंपार आनंद झाला़ गुरू चरणांचे दर्शन घेऊन त्यांची यथायोग्य पूजा केली़ दर्शना-अभावी इतकी वर्षे जीव किती व्याकुळ होत होता हे निवेदन केले़ त्यावर गुरू महाराज म्हणाले, गर्भातला जीवन बाहेर निघण्यास असाच तळमळत असतो़ पंरतु वेळ भरल्यावरच त्याला बाहेर पडता येते़ आता तुमचा गर्भवास संपला.
सद्‌गुरूंनी त्या दिवशी मुक्काम करून शिष्याच्या अनेक शंकांचे निरसन केले़ अगदी अल्पकाळातच शिष्याने मिळविलेले यश व वाढविलेली पचनशक्ती पाहून त्यांनाही मोठे समाधान वाटले़ पूर्वीचे संचित असल्याखेरीच इतक्या अल्प अवधीत उच्च शिखर गाठता नसते आले़ म्हणूनच ते म्हणाले की, द्यद्यमी फक्त झारीच्या छिद्रात अडकलेला कचरा काढण्यास निमित्त झालो़ कचरा दूर केला व खोळंबलेला प्रवाह पुन्हा जोमाने वाहू लागला बस्स ! दुसर्‍या दिवशी धौती-नेती चा अभ्यास देऊन सद्गुरूंनी नाथांचा निरोप घेतला़ यानंतर मात्र अविश्रांत साधनेचे तेल जिरवून जिरवून प्रज्वलित झालेली ज्योती आपली प्रकाशकिरणे आसमंतात फेकू लागली़ महादेवनाथांची खरी ओळख लोकांना पटू लागली़ काल वेडा-पिसा म्हणणारे लोक आता दर्शनासाठी गर्दी करू लागले़ आयाबहिणी, बायाबापड्या पूजा बांधू लागल्या़ संसारी तापलेले सावलीसाठी येऊ लागले़ प्रापंचिक अडीअडचणींचे गार्‍हाणे मांडल्या जाऊ लागले़ रोग-दुःख निवारण्यासाठी प्रसादाची अपेक्षा धरल्या जाऊ लागली़ व्याधी-उपाधीतून सुटण्यासाठी आशीर्वादाची याचना होऊ लागली़ सर्वांच्या दृष्टीत महादेव नाथबाबा होऊन गेले़.
बाबा म्हणायचे हलवायाच्या दुकानात मिठमिरचीचा सौदा मागणारेच बहुतेक लोक असतात़ दुकानातील हजर जिन्नस-परमार्थाचा मेवा-मागणारा जाणता भाग्यवान विरळाच़ परमेश्वरी लीला आपल्या जवळील ईश्वरी प्रसादाच्या ठेव्याचा इतरेजनांनाही लाभ देण्यास ती निरंतर उत्सुक असतात़ संसारी भटकणार्‍या जिवांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखविण्यास तळमळत असतात़.मागे बहुतांनी केलेले कार्य त्यांना पुढे चालवायचे असते़ साधना पूर्ण झाली की साधकाला सिद्धपण येते हे खरे़ पण सिद्ध पुरूष निष्क्रिय मात्र कधीच होत नाहीत़. उलट आता त्यांचे कार्य अधिक जोमाने सुरू राहते़.अंतरंगी उसळणारा आनंद स्तब्ध राहू देत नाही़ आत्तापर्यंत चाखलेला रस किती आणि कसा वाटू अशी तळमळ लागून जाते़ स्वतः काहीच मिळवायचे नसते पण जे मिळाले आहे तेच इतरांना द्यायचे असते़ उणीव दिसेल तिथे पूर्तता करणे हे खरे ईश्वरी कार्य़ हे कार्य आपल्या हातून घडावे हा दैवी संकेत त्यांनी जाणलेला असतो़ स्वतःच्या संकल्पांचे श्राद्ध त्यांनी केव्हाच उरकलेले असते़ ईश्वरी संकल्पाचे आता ते नम्र वाहक बनलेले असतात़ सत्‌प्रेरणेने ते आपले कार्य बजावित राहतात़ यालाच लोकसंग्रह साधना म्हणतात़ सर्वच संतांनी ही केली आहे़ पहिली साधना संपल्यावर नाथबाबांनीही आता ही दुसरी साधना सुरू केली़.
हातरूणला श्री शेषराव उर्फ नानासाहेब देशमुख नावाचे धनाढ्य गृहस्थ होते़ मांसाहार व मद्यप्राशन या गोष्टीचा त्यांना फारच नाद होता़ शिवराम सोनोने नावाचे बाबांचे एक मित्र त्यांच्याकडे नेहमी जात़ नानासाहेबांनी एक दिवस त्यांचे जवळ घरी पोथी लावण्याची इच्छा प्रदर्शित केली़ परंतु वाचन कोण करणार? सोनोने म्हणाले, नाथबाबांना विनंती करू नानासाहेबांना हे खरे वाटेना़ आपण इतके ‘नादी’असतांना बाबा आपल्याकडे कसे येतील असा संशय त्यांचे मनात येऊ लागला़ शेवटी दोघेही बाबांकडे विचारण्यास आले़ बाबा म्हणाले, द्यद्यमी जरूर येतो पण तुमचे ते खाणे-पिणे सोडत असाल तरद्गद्ग नानासाहेब एकदम कबूल झाले़ एका पुण्य-पुरुषाचे पाय आपल्या घरास लागतात याची त्यांना धन्यता वाटली़ आणि नाना व्यसनमुक्त झाले़.
बाबांच्या कृपेने दुसरेही एक नवल घडले़ हातरूणला पाथरकर समाजाची चांगली २०-२५ घरे आहेत़ मराठवाड्याकडे या समाजाला कामाठी म्हणून संबोधतात़ चोर्‍या, लबाड्या, फसवणूक, नाडणूक, दारु गाळणे वगैरे सर्व प्रकारचे अवैध धंदे करणे हा त्यांचा सामाजिक वारसा़ पिढीजात गुण उपदेशाच्या कोरड्या वार्‍याने कसे उडणार ? पण बाबांचे कृपा-चक्र इकडे वळले मात्र ! विस्मयकारक परिवर्तन घडून आले़ आज तो समाज एकही परंपरागत धंदा करीत नाही़ तरुण मुले-मुली सुशिक्षित होऊन नोकर्‍या करीत आहेत़ वडील-धारे इतरांसारखी शेतीकामे करून उपजिविका करीत आहेत़ एवढेच काय पण त्यांनी एक भजन मंडळ निर्माण करून नेमाने भजनाचा कार्यक्रम पार पाडतात़ त्या समाजातील सर्व लोक बाबांचे एकनिष्ठ भक्त आहेत़ जीवन सुधारतात ती माणसं संस्कार परिवर्तन करतात ते संत़ सुधारणांनी जीवन रसदार होते़ ते कसदार करण्यास मात्र परिवर्तनच हवे़ अशातर्‍हेने स्वात्मोद्धारानंतर इतरोद्धाराचे दैवीकर्म बाबांच्या हातून सहजपणे घडू लागले़ बाबांची खरी ओळख लोकांना पटू लागली़ तसतशी दर्शनेच्छूंची संख्या वाढू लागली आणि आज तर त्या संख्येची मोजदाद करणे अशक्य कोटीतील काम आहे़.
अंगीकृत कार्यास सहर्ष सहकार्य देणारी पत्नी मिळणे हा एक दुर्लभ भाग्य योग्य आहे़ हा योग ज्याला साधला तो त्रिभुवनात खरा भाग्यवंत पुरुष़ सॉक्रेटिस सारखा जगविख्यात तत्त्ववेत्ता किंवा संतश्रेष्ठ तुकोबा यांच्याही पदरात असले भाग्य पडले नाही, उलट त्यांच्या गृहिणी पति-कार्यात अडसर होऊन राहल्या़ शक्य होईल तेवढे दुःख, क्लेश, अडचणी निर्माण करण्यातच त्या माउल्यांना धन्यता वाटली़ आपल्या पतिराजांना ओळखण्यास कदाचित त्यांची बुद्धी थिटी पडली असेल, काय सांगावे ?
परंतु नाथबाबा मात्र याला अपवाद ठरले़ धर्मपत्नी वत्सलाबाईंनी बाबांच्या मार्गात कधीही व्यत्यय येऊ दिला नाही़ उलट सर्वतोपरी अमोल सहकार्य केले़ संसार यशस्वीपणे सांभाळला़ बाबांना कधी एक शब्दानेही दुखवले नाही़ विपन्नावस्थेत घरात मिळेल त्या मिठ-भाकरीवर संतुष्ट राहिल्या़ चुलीजवळची अडचण कधी ओसरीवर येऊ दिली नाही़ आल्या-गेल्या पाहुण्यांच्या वर्दळीने कधी चिडल्या नाहीत की बाबांच्या प्रपंच-दुर्लक्षामुळे कधी त्रागा केला नाही़ अवघाची संसार सुखाचा करून सर्व कुटुंब आनंदे भरून काढले़ एवढेच नव्हे तर स्वतःही त्यांनी योगसाधना करू पुष्कळ उच्च अवस्था प्राप्त करून घेतली़ बाबा सांगतात की द्यद्यती स्वयंपाक करतांना सुद्धा द्यअनाहतद्ग गजर-मुरलीध्वनी ऐकत राही, हे दृश्य जेव्हा मी पाहत असे तेव्हा वाटायचे की अशा भावावस्थेत पकलेला स्वयंपाक आपल्याला खाण्यास मिळतो; किती भाग्यवान आपण ! त्यांच्या वात्सल्यपूर्ण वागण्यामुळे सारे भक्तगण त्यांना ‘आई’ म्हणूनच संबोधित़ आईनी घरी येणार्‍या सर्वच लहानथोरांवर अलोट प्रेम केले़ बाबा म्हणतात, ती या घरातील साक्षात अन्नपूर्णा होती केवळ मूठभर पेटवणाने शिजणार्‍या तुरीच्या डाळीत कितीतरी लोक तिने जेऊ घातले़ नुपूर कधीच पडली नाही़.
इ़.स़. १९६२ सालचा मार्च वा एप्रिल महिना असेल़ बाबांचे भाचे जगदीश पाठक बैठकीत झोपले होते़ अचानकपणे त्यांच्या डोळ्यासमोर एक दिव्य तेजोवलय दिसू लागले़ पाहता पाहता त्या तेजाने शिरडीच्या साईबाबांचे रूप धारण केले़ ते जगदीशला म्हणाले, द्यद्यनाथबाबा हे माझेच अंश आहेत़ माझे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यास त्यांचा अवतार आहे़. पाहतो तो बैठकीत कोणीही नाही़ त्याने ते स्वप्न बाबांना सांगितले़ बाबांनी विशेष अशी प्रतिक्रिया दर्शविली नाही पण एवढेच म्हणाले की, ह्या गोष्टीचा बभ्रा करू नकोस, प्रत्यंतर आल्याशिवाय लोक विश्वास ठेवणार नाहीत जगदीशने ह्या घटनेचा कोणाजवळही उल्लेख केला नाही़ परंतु लगेच जून महिन्याच्या १० तारखेस बाबांनी शिरडीस जाण्याचा बेत केला़ समागमे तेल्हार्‍याचे श्री तुकाराम पाटील, डामरे गुरूजी, बळीराम पाटील व गावातील इतरही काही मित्रमंडळी होती़ शेगावी गजानन महाराजांचे दर्शन घेऊन सर्व शिरडीस पोहोचले़ तेथे गेल्यावर इतर मंडळी आपापल्या कार्यात मग्न झाली़ बाबांना मात्र चैन पडेना़ पूजा करण्याची इच्छा बळावू लागली़ मन एकांताचा शोध घेऊ लागले़ तेथील धर्मशाळेच्या एखाद्या खोलीत निवांत जागा मिळेल या आशेने ते खोल्यांसमोरून फिरू लागले़ फिरता फिरता एका खोलीच्या दारात एक शेठजी लाडू वाटत उभे असलेले दिसले़ बाबा चटकन त्या खोलीत शिरून कोपर्‍यात जाऊन बसले़ लगेच आपली नित्याची मानस पूजा करण्यात तल्लीन झाले़ शेठजी अवाक होउᆬन पाहतच राहिले, एका अनोळखी माणसाने बिना परवानगीने इतक्या धिटाईने आपल्या खोलीचा कब्जा घेतलेला पाहून त्यांना मोठा अचंबा वाटला़ परंतु बाबांची पूजा पाहून काही म्हणायचे धैर्य मात्र त्यांना झाले नाही़ एवढेच नव्हे तर पूजेत काही व्यत्यय येऊ नये म्हणून स्वतः ते दाराजवळ उभे राहून येणार्‍या जाणार्‍याला स्वतब्ध करू लागले़ बाबांची पूजा निर्विघ्नपणे पार पडली़ शेठजीनी जवळचे लाडू प्रसाद म्हणून बाबाजवळ दिले व म्हणाले द्यद्यतुमच्या सारख्या इसमाचे दर्शन झाले आमचे येथे येणे सार्थकी लागले़द्गद्ग बाबांनी त्यातील काही प्रसाद शेठजींनाच खायला दिला़ त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना़ बाबा निघून आले तरी ते फक्त पाहतच निश्र्चल उभे राहिले़ शिरडी साई दर्शनानंतर मात्र बाबांनी घराबाहेर पडणे आजबात वर्ज्य केले़ घरात बसल्याच विश्र्वाचा संसार न्याहाळतात़ शिरडीहून परतल्यानंतर बाबांच्या जीवनक्रमाचे पूर्ण वळण बदलले़ त्यांनी घराबाहेर जाणेयेणे आजबात बंद केले़ दिवसभर आपल्या बैठकीतच बसून राहू लागले़ त्यांच्या दर्शनासाठी मात्र दुरदुरून लोक येत़ विविध जाती-पंथाचे लोक त्यात असत़ आबाल वृद्धांना, बाया बापड्यांना, सुशिक्षित, आशक्षितांना त्यांचे दर्शन ईश्र्वरी कृपा वाटे़ येणार्‍या भक्तांना त्यांच्या भेटीने मानसिक शांतीचा प्रत्यय येई़ आत्मसाक्षात्काराच्या खुणा बाबांच्या बोलण्या-वागण्यातून स्पष्टपणे उमटू लागल्या़ वाणीला दैवी सामर्थ्याचे तेज मिळाले़ मुखातुन बाहेर पडणारे शब्द प्रत्यक्षात उतरू लागले़ त्यामुळे असंख्य भक्तांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले़ भावश्रद्धेने बाबांकडे येणारा भक्त निराश होऊन जात नसे़ भक्तांची सदिच्छा थोड्याच दिवसात त्याला आपले इच्छित पूर्ण झाल्याचा अनुभव येई जशी जशी लोकांना प्रचिती येऊ लागली तसतशी दर्शनेच्छूंची संख्या वाढू लागली़.
आतापर्यंत बाबांच्या कृपामृताची चव शेकडो भक्तांनी चाखली आहे़ अनेक पीडित जिवांना बाबांनी आपल्या करुणामय दृष्टीने कृतार्थ केले आहे़ संतती, संपत्ती, संकट-विमोचन, आजारनिवारण अशा विविध प्रकारच्या इच्छा बाबांच्या कृपा प्रसादाने पूर्ण झाल्या आहेत़ बाबांच्या सहज शब्दांतही ईश्र्वरी सामर्थ्य असल्याचा अनुभव अनेकांना अनेकदा आला आहे़ मुखाबाहेर पडलेले त्यांचे शब्द अगदी थोड्या दिवसांतच खरे झाल्याचे दिसून आले आहे़.
हातरूणचे श्री श्रावण उर्फ बाबुराव दहीकर हे आपला मित्र श्री महादेवराव सोनोने यांच्या लग्नास व्याळ्याला जाण्यात अत्यंत आतुर झाले होते़ बाबांनी त्यांना न जाण्यास सुचविले़ परंतु बाबुराव गेलेच़ इकडे मात्र त्यांचा ४ वर्षांचा मुलगा अकस्मात आजारी पडून लगेच गतप्राण झाला़ लग्न आटोपून परत येतांना रस्त्यात बैल उधळून बाबुराव गाडीबाहेर फेकले गेले व मरता मरता वाचले़ घरी आल्यावर मग कुठे त्यांना बाबांनी जाण्यास मनाई का केली होती यातील रहस्य उमगले़.
अकोला येथील दलित समाजाचे पुढारी श्री शामराव सावळे यांच्यावर १९६० साली अत्यंत कठिण परिस्थिती गुदरली़ जवळची सर्व शेती विकून टाकण्याचा प्रसंग आला़ ते बाबांच्या दर्शनास आले़ बाबांनी एक वर्षभर धीर धरून शेती न विकण्याचा व नंतर प्लॉट पाडण्याचा सल्ला दिला़ त्याप्रमाणे वागल्यावर त्यांना भरमसाट प्राप्ती झाली आणि सर्व कुटुंबास सुखाचे दिवस पहावयास मिळाले़.
माळेगांव बाजार येथील श्री गुणवंतराव पाटील हे सतत डोकेदुखीच्या व्यथेने आतशय त्रस्त झाले होते़ मुंबई पर्यंतच्या सर्व डॉक्टरांचे उपचार करवूनही गुण येईना़ अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले़ त्यांची आई त्यांना घेऊन एक दिवस बाबांचे दर्शनास आली़ बाबांनी त्यांचे सांत्वन करुन श्वास घेण्याचा एक उपाय सुचविला़ त्याप्रमाणे काही दिवस वागताच डोकेदुखी तर पळालीच पण त्यांच्या पत्नीस संतती लाभही झाला़ उगवा येथील रेल्वे स्टेशनमास्तर श्री ना़ मा़ सातपुते यांची पत्नी १९६६ साली दम्याने आतशय आजारी होती़ सर्व प्रकारचे उपाय केलेत पण आराम लाभेना़ सहा महिने पर्यंत शब्दशः आंघोळ, झोप व विश्रांती काहीही करता येईना़ शेवटी बाबांच्या सल्ल्याप्रमाणे पाच बुधवार दर्शनास येण्याचा निग्रह केला़ पाच वार्‍या पूर्ण होताच दम्याचा विकार निष्प्रभ झाल्याचा अनुभव आला़ वडाळीचे (सटवाई) श्री गंगाधर पाटील यांना एका कोर्ट केसमध्ये एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती़ ते बाबांच्या दर्शनास आले़ बाबांनी आशीर्वाद दिला की, द्यद्यतुम्ही निर्दोष सुटाल, अपील कराद्गद्ग त्याप्रमाणे केल्यावर ते खरोखरच निर्दोष सुटले़ ग्रंथकार सोनोनेच्या चेहर्‍यावरील पक्षघाताचा विकार सुद्धा बाबांच्या करुणामय उपचाराने बरा झाला़.
एकदा बाबा आपल्या शेतात काम करीत होते़. उन्हातान्हात एक सज्जन त्यांना भेटायला आले़ ते अमळनेर कडील एका मोठ्या कारखान्याचे मालक होते़ ते जवळ येताच बाबा त्यांचा उद्‌देश ओळखून उद्गारले, सट्ट्यामुळेच तुमचे तिनपाट वाजेल़ ते गृहस्थ चकार शब्द न बोलताच आले तसे निघून गेले़ परंतु लगेच थोड्या दिवसांनी परत येऊन बाबांची भेट घेतली व म्हणाले,तुमच्या शब्दाप्रमाणे माझा लाखो रुपयांचा कारखाना गेला़ आता पुढं की माय करू? बाबा बोलले सट्‌टा सोडून तुम्ही कोणताही उद्योग करा़ सर्व संपत्ति पुन्हा मिळवाल़. आज ते गृहस्थ एका मोठ्या प्लॅस्टीक कारखान्याचे मालक आहेत़.
पळसोद गावाला पाण्याची फार टंचाई, गावकर्‍यांना ३-४ मैलावरून गोडे पाणी आणावे लागे़ कारण गावात खोदलेल्या सर्व विहिरींचे पाणी खारे असायचे़ या गावाला बाबांचे मामेभाऊ श्री रामनाथ राहतात़ त्यांची १२ वर्षापासून भेट नव्हती तेथील मंडळीकडून अभक्ष्य खाणेपिणे वर्ज्य करण्याची कबूली घेऊनच बाबा तेथे गेले़ दुसरे दिवशी सकाळी रामनाथाचे एका शेतात जाऊन विशिष्ट ठिकाणी बाबा उभे राहिले़ जवळच्या लोट्यातील पाणी पिऊन थोडेसे त्याच जागेवर शिंपडले़ आणि याच ठिकाणी विहीर खोदण्यास रामनाथला सांगितले़ पुढे आश्चर्य असे की तेथे खोदलेल्या विहिरीला गोडच नव्हे तर भरपूर पाणी लागले़ असाच अनुभव तेल्हार्‍याचे श्री रमेश खारोडे यांना सुद्धा आला आहे़.
एक दिवस एक मुसलमान बंधू बाबांकडे आले आणि सांगू लागले की त्यांच्या नात्यातील एक तरुण मुलगा दोन दिवसांपासून घरातून निघून गेला आहे़ त्याने शंभर दोनशे रुपये सुद्धा नेले आहेत़ नातेवाईकांकडे विचारपूस केली पण तपास लागला नाही़ ते ऐकून बाबा सहपणे बोलले, द्यद्यतुम्हा लोकांचे अवलिया, सूफी (संत) बर्‍हाणपूर व अजमेरला असतात़ ते अशा भटक्या जिवांना जरुर आपल्याकडे बोलावून घेतात़ तुम्ही अजमेरकडे तपास करून पहा म्हणजे कळेलद्गद्ग दोन दिवसांनी त्या बंधुंनी येऊन बातमी सांगितली की तो मुलगा अजमेरला सापडला आहे़.
एका सकाळच्या वेळी एक नवबौद्ध बंधू बाबांकडे येऊन गयावया करून बोलू लागले द्यद्यबाबा, माझी गाय कालपासून दिसत नाही़ जरा पंचांगात पाहून सांगा ना, कुठे सापडेल ती़ बाबा हसून म्हणाले द्यद्यमला गड्या पंचांग काहीच कळत नाही़ बरं, पाहिलेही तर त्या पंचांगात तुझी येवढी मोठी गाय कशी सापडेल? तू असं कऱ त्या बाजूकडे (बोटाने दर्शवून) शोध करून पहा़ सापडलीच तर तिकडेच नारळ वगैरे घेऊन कोण्याही देवळात प्रसाद वाटून टाक़ इकडे येऊही नकोद्गद्ग दोन दिवसांनी ते गृहस्थ गाय सापडल्याच्या आनंदामुळे बाबाकडेच प्रसाद घेऊन आले़.
जळगांवचे (जामोद) वकील शेषराव तुकाराम पाटील यांच्या पत्नी (१९६३-६४) गरोदर होत्या़ जास्त त्रास होऊ लागल्यामुळे डॉक्टरकडून तपासणी करवून घेतली़ डॉक्टरांनी एक्स रे मशीनने तपासून सांगितले की, जुळ्या मुलांचा गर्भ असून, एक उत्तम आहे पण दुसरा मात्र ठिक नाही़ प्रसुती समयी ऑपरेशन करावे लागेल़. वकील साहेब काळजीत पडले़ बाबांकडे येऊन सर्व हकिगत निवेदन केली़ बाबा किंचित्‌काल विचारमग्न झाले व लगेच बोलले, मी आत्ताच जाऊन पाहून आलो़ दोन्ही गर्भ उत्तम पोसले गेले आहेत़ प्रसुति सुखरुप होईल. त्यानंतर सर्व क्रिया व्यवस्थित पार पडल्या़.
तेल्हार्‍याचे श्री शिवाजी हायस्कूलचे त्या वेळचे मुख्याध्यापक श्री तायडे गुरुजी हे आपण एम़.ए़. ची परीक्षा बाबांच्या कृपाप्रसादाने पास झालो असे समजतात़ एकदा त्यांनी बाबांना त्यांच्या गावी दारव्ह्यास चालण्याचा आग्रह केला़ तेव्हा बाबा चटकन उद्गारले, मी तुमच्या घरी तर केव्हाच जाऊन आलो़ आता आणखी कशाला? इतके बोलून बाबांनी तायडेच्या घरातील देव्हारा, पूजेची भांडी, त्यावर कोरलेली नांवे, घराचा दरवाजा ज्या दिशेस आहे ती दिशा, स्नानाचे ठिकाण, सर्व खाणाखुणा अगदी इत्थंभूत सांगितल्या हे ऐकून तायडेंना सर्व काही उमगले़ तेल्हार्‍याचे श्री पांडुरंग बनकर शिवाजी नांवाच्या आपल्या मुलाचा लग्न-संबंध पक्का करुन बाबांच्या दर्शनास गेले होते़ बाबांनी वधू मुलगी एकदा पाहून यावी अशी त्यांनी बाबांना विनंती केली़ मुलीचे माहेर पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात होते़ त्यामुळे बाबा म्हणाले, अहो इतक्या दूर जाऊ ? एवढे पैसे कुठे आहेत ? देता तुम्ही पैसे ? बनकर स्वगावी परत आले़ पुढे लग्नाची पत्रिका घेऊन आणखी आमंत्रण द्यावयास गेले़ तेव्हा बाबा हसून उद्गारले आलो आपली सुनबाई पाहूऩ आपल्या शिवाजी सारखीच काळी-सावळी, सडपातळ आहे़ बरी आहे़ शेतातील एक घरातच राहतात़ तिने आपल्या हाताने मला पाणी सुद्धा पाजले़द्गद्ग हे ऐकून मात्र श्री बनकर यांना अचंबा वाटला़ विश्र्वसंचार करणार्‍या आत्मशक्तीच्या प्रभावाची खूण पटली़ ह्याच बनकरांनी एकदा बाबांना मोठ्या कळकळीने म्हटले होते, द्यद्यबाबा, तुम्ही सर्व ठिकाणी जाता पण आमच्या गावाला नाही येत़ या ना एखादे वेळी बाबा बसल्या जागीच म्हणाले, द्यद्ययेत नाही कसे म्हणता? मी तर नेहमीच येतो़ तुमच्या शेतात सुद्धा मी फिरुन आलो़ तुमचे शेत गावाच्या उत्तर दिशेस आहे़ त्याच्या सभोवती अशा अशा निशाणी आहेत़ सध्या त्यात वितभर उंचीची पर्‍हाटी आहे़ पण बाभळीच्या झाडाजवळ मात्र जास्त उंच पर्‍हाटी आहे़ तुम्ही शेतात गेल्यावर म्हणाले होते ना की एवढी पर्‍हाटी सर्व शेतात राहिली तर किती चांगले होईल हे प्रत्यक्ष वर्णन ऐकून बनकर बिचारे काय बोलणार ! बाबा येत नाहीत असे कोणत्या तोंडाने म्हणणार !
धर्माधिकारी नावाचे एक ब्राह्मण संन्यासी माहूरक्षेत्री गेले़ ते पूजेस बसले असतांना लक्षात आले की जवळ पाणी नाही़ मध्येच उठल्यास पूजेत खंड पडेल़ त्यांनी बसलेल्या जागीच बाबांचे स्मरण केले़ अल्पावकाशात भास झाला की, पूजा-पात्रात पाणी पडले आहे़ डोळे उघडून पाहतात तो खरोखरच पात्र पाण्याने भरलेले होते़.
बाबा कलकत्त्यास कधीच गेलेले नव्हते़ पण एकदा दसर्‍याचे दिवशी बसता बसता बाबांनी कलकत्त्याच्या कालीमातेच्या उत्सवाच्या सोहळ्याचे वर्णन तंतोतंत सांगितले़ कित्येक वेळा बाबा पंढरपूर क्षेत्राचे हुबेहूब वर्णन करुन सांगत़ बोटाने समोरच्या जमिनीवरच त्या क्षेत्राचे पूर्ण चित्र रेखाटून दाखवित़ (बाबांनी पंढरपूर पाहिले नाही) गर्भकाळात दोन महिने पंढरपूरलाच वास्तव्य असल्यामुळे तेव्हाच मी पूर्ण पंढरपूर पाहिले आहे. असे ते स्वमुखाने सांगत़ आकोटला विजकामाचे ठेकाकाम करणारे हजारसिंग नांवाचे एक पंजाबी गृहस्थ राहतात़ त्यांच्या पत्नी पंजाबात खूप आजारी होत्या़ वैद्य डॉक्टरांच्या उपचारांनी गुण येईना़ बाईंना एके रात्री स्वप्नात एक साधुमूर्ती दिसली़ तिने बाईंना आभासांत तीर्थजल दिले़ बाईंनी ते तीर्थ प्राशन केले़ थोड्याच दिवसात बाईची प्रकृती अगदी ठणठणीत बरी झाली़ पुढे त्या बाई आकोटला पतीकडे आल्या़ तिथे त्यांनी बाबांचा फोटो पाहिल्याबरोबर उद्गार काढले, द्यद्ययही बाबाने मेरी ख्वाबमे आकर मुझे तीर्थ दिया़ कहॉं है यह बाबा?बाबांचा मुक्काम त्यावेळेच तेल्हार्‍यास होता़ पतिपत्नी तेथे गेले आणि बाबांचे दर्शन घेऊन आपल्या अनुभवांची खातरजमा करुन घेतली़.
बापूसाहेब ठाकरे नावाचे एक सधन गृहस्थ नागपुरास गिरीपेठेत राहतात़ एक दिवस ते इतवारी विभागात स्वतःची मोटर चालवीत होते़ अकस्मातपणे बकरीची दोन पिले त्यांच्या गाडीच्या चाकाखाली सापडली़ ठाकरे गाडीखाली उतरुन पाहतात तो दोन्ही पिलांच्या जिभा बाहेर पडून ती मृत्यूपंथाला लागलेली़ ते सुन्न मनाने ते दृश्य पाहत गाडीच्या आधाराने उभे राहिले़ थोड्याच वेळात पुष्कळसे लोक तेथे जमा झाले व द्यहाणामाराद्ग असे ओरडू लागले़ ठाकरेंना काय करावे हे सुचेना़ डोळे मिटून त्यांनी बाबांचे आर्तभावे स्मरण केले़ इकडे बघे लोक सारख ओरडत होतेच पण क्षणातच ते शांत झाले़ कारण ती दोन्ही पिल्ले आता सावध होऊन चालू लागली होती़ लोकांना फारच चमत्कार वाटून ते ठाकरेचेच पाय धरू लागले़ परंतु वेळ साधून त्यांनी चटकन गाडी सुरु केली व तेथून पळ काढला़ त्याच वेळी तेल्हारा येथे श्री तुकाराम पाटील यांच्या स्वप्नात येऊन बाबांनी सांगितले की, मी आत्ताच नागपूरला जाऊन आलो आहे़.
तेल्हार्‍याचे शिक्षक श्री भटकर यांच्या पत्नी १९६४ सालच्या फेब्रुवारी महिन्यात ९ तारखेस फार आजारी होत्या़ ऋतुस्त्रावाऐवजी रक्तस्त्राव सपाटून होत होता़ दुर्दैवाने त्या दिवशी गावात एकही डॉक्टर हजर नव्हते़ भटकर गुरुजी सर्व गांव फिरले, पण कोणताच उपचार सापडेना़ आकोल्यास न्यावे तर गाडीची सोय नाही़ कसे होईल अशी एकसारखी विवंचना लागून राहिली़ होता होता रात्र झाली़ सर्वजण चिंतेचे पांघरुण घेऊन झोपेची आराधना करू लागले, भटकर बाईचा किंचित डोळा लागला असेल़ स्वप्नातच्या त्या पूर्णा नदीच्या आलकडील काठावर उभ्या आहेत असे पाहू लागल्या़ पलीकडील काठावर बाबा उभे दिसले़ बाबांनी हाती असलेला जलकलश बाईच्या हातात दिला़ बाईनी लगेच ते जल प्राशन केले़ तितक्यात बाईना जाग आली पाहतात तो रक्तस्त्राव बंद होऊन सर्व वेदना नाहीशा झालेल्या होत्या़.
तेल्हार्‍याचे श्री तुळशीराम डामरे एके दिवशी बाबांच्या दर्शनास गेले होते़ त्यावेळी डामरेच्या पत्नीला ४-५ महिन्यांचा गर्भ होता़. डामरे जाताच बाबा म्हणाले आता लवकरच लाडू खाऊ घालावे लागतील पुढे योग्यवेळी डामरेंना खरोखरच पुत्ररत्न झाले़ उगव्याचे श्री बाहकर यांच्या डोक्यात काहीतरी बिघाड होता़ वेडाच्या झटक्यात ते अगदी बेताल वागत़ त्यामुळे इतरांना आतशय उपद्रव होई़ म्हणून लोकांनी त्यांना वेडा समजून हातापायात बेड्या टाकल्या़ असे कित्येक महिने गेले़ बाबांना हे समजले़ बाबांना समोर पाहिल्याबरोबरच बाहकरांचे वागणे बदलले़ ते जोरजोराने भजने म्हणू लागले़ बाबांच्या हातात हात घालून पे्रमाने वार्तालाप करू लागले़ इतरांना मात्र उगीचच चिंता वाटू लागली़ ह्या वेड्याजवळ गेल्याने बाबांचे काय होईल, अशी चुटपुट त्यांच्या मनाला लागली़ पण त्या दोघांचे वागणे मात्र अगदी मित्रत्वाने सुरू होते़ पुष्कळ वेळ लोटला तरी काहीच अपप्रकार घडला नाही़ ते पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले नंतर त्यांनी बाबांना मिष्टान्नाचे जेवण घातले़ तेव्हापासून पुढे बाहकर समजुतदार दिसू लागले़ वेडेपणाची लहर निघून गेली़.
एकदा तेल्हार्‍याचे पांडुरंग बनकर आपल्या एका मित्रासमवेत मुलंबाळं घेऊन खंडव्यास गेले होते़ खंडव्याला धुनीवालेदादा यांची समाधी व देऊळ आहे़ रात्री मुक्काम कोठे करावा म्हणून ही सर्व मंडळी त्या देवळात गेली़ मुलेबाळे घाण करतात म्हणून त्यांना देवळात थांबण्याची सक्त मनाई असल्याचे तेथील पुजार्‍याने बजावले़ ही मंडळी थोडावेळ थांबली असेल तोच एका मुलाने तेथे घाण केलीच़ पुजारी ते पाहिल्यावर अत्यंत संतापले़ सर्व देऊळ धुवून पुसून स्वच्छ करून देण्याचा त्याने हुकुम फर्मावला़ त्याप्रमाणे करू देऊन सर्वजण परततांना बनकरास दिसले की, खंडव्याच्या समाधीवर नाथबाबा बसले आहेत आणि ते बजावित आहेत की, आम्ही एकाच शक्तीचे अंश आहोत.
१९६२ सालच्या जून महिन्यातील घटना़ बाबा शिरडीहून नुकतेच परतले होते़ घरी त्यांनी साईबाबांच्या चरित्राचे वाचन सुरू केले होते़ १००-१५० स्त्रीपुरूष श्रवण करण्यास बाबांच्या घरी जमले होते़ वाचन चालू असतांना एका अध्यायात माझी हाडे माझ्या तुर्बतीतून बोलतील असा उल्लेख आला़ अकस्मात कोणीतरी रामराम केल्याचा आवाज आला़ पद्धत म्हणून सर्वांनी ‘रामराम’ करुन प्रत्युत्तर दिले़ पण क्षणात सर्वांच्या लक्षात आले की आपण कोणाला ‘रामराम’ करीत आहो़ ती व्यक्ती कोठे दिसत नाही़ आवाज मात्र आला़ तेव्हा सर्वांना निश्चित वाटले की इतक्या जवळून ‘रामराम’ करणारा, आवाराच्या आत असूनही न दिसणारा, तिसरा कोणी नसून ही साईबाबांचीच लीला असली पाहिजे़ नाथबाबा हे सुद्धा त्याच शक्तीचे अंश आहेत़ त्या दिवसापासून पोथी वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी, ‘रघुपती राघव राजाराम’ हा गजर करण्याची प्रथा सुरू करण्यात आली़.
वरुडा (ता़ खामगांव) येथील ह़.भ़.प़. श्रीराम महाराज हे वारकरी संप्रदायातील एक सत्पुरुष कीर्तनकार होते़ कीर्तने करीत ते नेहमी गावोगावी व्रत म्हणून फिरत असत़ येलोरा चावर्‍याचे संत सखाराम महाराज यांचे ते शिष्य होते़ ते मेहूण मुक्ताबाई व सखाराम महाराज संस्थानचे संचालक होते़ योगायोगाने एकदा त्यांचे हातरूणला कीर्तन होते़ बाबा सुद्धा कीर्तनास गेले होते़ बाबांची व त्यांची यापूर्वी गाठभेट नव्हतीच़ परंतु येथे दृष्टादृष्ट होताच महाराजांचे मनात बेचैनी उत्पन्न झाली़ अंतःकरण तळमळू लागले़ कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यावर बाबा घरी परत आले़ पण तिकडे महाराज आपल्या सहकार्‍याला म्हणाले, मला त्या भगवी टोपीवाल्या व्यक्तीकडे घेऊन चला बाबा काही मित्रमंडळीसह घरी बसून होते़ तितक्यात श्रीराम महाराज तेथे आले़ बाबांचे दर्शन होताच आपली भावस्थिती पालटत आहे असे त्यांना आतल्या आत वाटू लागले़ देहभान हरपत आहे असा भास होऊ लागला़ बाबांनी त्यांना एकानंतर एक अंगावरील सर्व कपडे काढण्याची आज्ञा केली़ तसेच महाराजांच्या हातून घडले़ शेवटी फक्त एक लंगोटी अंगावर राहिली़ नंतर बाबांनी त्यांना खूप बिड्या ओढण्यास दिल्या़ बाबांनी बिडी पेटवून द्यावी व महाराजांनी ती प्यावी असा क्रम सतत चालला़ विड्यांचे एक डझन बंडल तरी फस्त केले असावे़ महाराज बिडी पीत असतांनाच बाबा आपल्या तळहातावर गांजा कसण्याची क्रिया करीत़ मग जमलेल्या लोकांना बिडीच्या धुराचा गांजा सारखा दुर्गंध येऊ लागे़ त्याप्रसंगी द्यद्यमी स्वतः गजानन महाराज आहे व सध्या शेगांवात आहे. असा सतत भास होत असे हे श्रीराम महाराज नंतर मित्रमंडळीला सांगितले़ तेव्हापासून श्रीराम महाराजांची बाबांवर परम श्रद्धा जडली़ दरवर्षी गुरुपौर्णिमेस हातरूणला आपल्या कीर्तनाचा कार्यक्रम देण्याचा त्यांनी संकल्प सोडला़ आणि त्या दिवसापासून अंगावर कपडे घालणे सुद्धा वर्ज्य केले़ पुढे तेल्हार्‍यास श्री तुकाराम पाटील यांचे वाड्यात असाच एक प्रसंग घडला़ त्यावेळी बाबांनी या महाराजांना साईबाबांचा साक्षात्कार घडविला़ महाराजांच्या अंगावर स्वहस्ताने कपडे चढविले़ तेव्हापासून महाराज कपडे वापरू लागले़.
साधू हा घरदार सोडून भटकणारा माणूस असावा़. त्याचे अंगाला राख फासलेली दिसावी़ दाढी जटा वाढवून त्याने भगवी वस्त्रे अंगावर चढविलेली असावी़ डोळे कशाने तरी धुंद झालेले असावेत़ त्याच्या हातून काही विलक्षण चमत्कार घडावेत़ त्याचे बोलणे-वागणे असामान्य असावे़ असा परंपरागत लोकसमज आहे़ साधुविषयी तयार झालेला दृष्टीकोन आहे़ ही बाह्य चिन्हे दिसली नाहीत तर त्याच्या साधुपणावर लोक विश्वास ठेवायला राजी नसतात़ परंतु हा रूढ दृष्टीकोन घेऊन जे जे कोणी हातरूणच्या बाबांच्या दर्शनाला गेले त्यांची फसगतच झाली़ कारण हे बाबा आपण ठरविलेल्या मुखवट्याहून वेगळेच़ जटा व दाढी ह्या व्यतिरिक्त वरीलपैकी कोणतेही चिन्ह त्यांच्याजवळ नव्हते़ ते पूर्णपणे संसारी पुरुष होते़ इतर सामान्य गृहस्थाप्रमाणे मुलं-बाळं शेती-वाडी, सर्वच गोष्टी त्यांच्या जवळ होत्या़ कमरेला धोतर, पांढर्‍या रंगाचा पूर्ण सदरा व एक दुपट्टा हा त्यांचा नेहमीचा वेष़ पूजा-अर्चेच्या कर्मकांडात ते गुरफटलेले दिसले नाहीत़ डोळ्यात धुंदी चढवून विशिष्ट आसनावर बसलेले दृष्टीस पडले नाही़ अगदी तुमच्या आमच्या सारखेच चारचौघात वावरतांना, बोलतांना दिसले़ फक्त जटा व दाढीच काय ती वाढलेली दिसे़ तीही साधूचे लक्षण म्हणून मु‌द्दाम राखलेली नव्हती़ सहज योगानेच ती राहिली़ तीन वर्षापूर्वी ते न्हाव्याकडून गुळगुळीत दाढी करून घ्यायचे़ पण पुढे थोडी नवलाची घटना घडली़ ते स्वतः सांगत एक दिवस न्हावी दाढी करायला आला तेव्हा माझ्या अंगात सणकून ताप भरला़ नंतर दोन तीन वेळा असेच झाले़ न्हावी घरी येतांना दिसला की अंगात ताप चढायचा़ मला वाटले की दाढीला अपल्या जवळून काही जाण्याची इच्छा दिसत नाही़ तिला इथेच राहावेसे वाटते, राहू द्या़ आपले काय जाते? पण तिला बजावले की बाई, तेल लावणे विंचरणे वगैरे तुझी आवडती मशागत माझ्याकडून नियमाने होणार नाही, बरं त्यामुळे जर का ऊवा ची पैदास झाली तर पहा रे बुवा़ बस्स एवढेच़ तेव्हापासून दाढी जटा वाढल्या अन्‌ कायम राहिल्या़ कपड्यांच्या बाबतीतही त्यांना स्वतःची आवड निवड नसायची़ श्रद्धाळू भक्त प्रेमाने आणून देत आणि ते घालत असत़.
यादवनाथांच्या समाधीस्थानी श्री नाथ पांडुरंग मंदिर उभारल्या गेले़ त्यालाच शांतिमंदिर म्हणतात़. ते मंदिरही बाबांनी स्वतः उभारले नाही़ त्यासाठी मदत स्वतः काही गोळा केली नाही, काही भक्तांची इच्छा मंदिर बांधण्यास झाली़ त्यांनीच परस्पर निधी गोळा केला़ अनेकांनी स्वेच्छेने मदत पाठविली़ ज्याला जे वाटले ते त्याने दिले़ मंदिराची उभारणी झाली़ प्रवचन वगैरे कार्यक्रमासाठी एक प्रशस्त स्वतंत्र खोली सुद्धा बांधली़ ही सारी भक्तांचीच करणी़ बाबा केवळ साक्षीभूत मार्गदर्शक़ त्या मंदिरातच बाबा दिवसभर बसत़ सकाळी ५-६ ला ते घरुन मंदिरात येत़ दुपारचे जेवण तेथेच काही भक्तांबरोबर होत असे़ सायंकाळी तिथेच पोथी वाचन होई़ प्रार्थना प्रसाद होऊन ठीक अर्ध्या तासात हा कार्यक्रम आटोपत असे़ गावातील मंडळी नेमाने हजर राही़ काम धंद्यात गुंतलेल्या लोकांना जास्त वेळ कशाला बसवावे म्हणून बाबा हा कार्यक्रम फारच आटोपता घेत असत़ आपले नित्याचे उद्योग सांभाळूनच पोथी वाचन वगैरेचे कार्य ईश्वराचे भजन-चिंतन केले तरी पुरे़ धर्म साधण्यासाठी नियमित कर्म सोडण्याचा उपदेश व आचरण बाबा कधीच करीत नसत़ बाबांची ही दिनचर्या बाराही महिने अशीच चाललेली असे़ मागील अनेक वर्षांपासून मंदिरातील प्रवचनधामात दर रविवारी प्रवचने होतात़ प्रवचनकार काही नेमलेला नसतो़ ऐनवेळी जो कोणी असतील त्या मधूनच एक-दोन व्यक्तिंना बाबा बोलण्यासाठी आज्ञा देतात़ कोणी नसले तर तेल्हार्‍याचे श्री वसंतराव गावंडे गुरूजी असत़ त्या व्यक्ती जे काही सांगतील त्यालाच बाबा प्रवचन नाव देत़ कोणत्याही गोष्टीचे पूर्व-संकल्प बाबांना पसंत नसत़ वेळेवर सहजपणे जे घडेल तीच ईश्वरी प्रेरणा अशी त्यांची धारणा़ कर्ता करविता तो भगवंत आहे़ त्याला जे योग्य वाटते ते तो आपल्याकडून बरोबर योग्य वेळी करवून घेतोच़ संकल्प त्याचेच़ आपले काय ? त्याचेच घ्यावे; त्यालाच द्यावे़.
घरी अगर मंदिरात भेटीसाठी आलेल्या पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य करण्यास बाबा कधी चुकत नसत़. चहा-पाणी, साखर-पाणी, पानसुपारी वेळेवर जे असेल ते दिल्यावाचून पाहुण्यांची रवानगी होत नसे़ प्रत्येकाशी बोलल्याशिवाय बाबांना चैन पडत नसे़ पुष्कळ वेळा काही मुक्कामाचेही पाहुणे असत़ ऊन, पाऊस, थंडी कशालाच ते जुमानत नसत़. ग्रामीण, शहरी, आशक्षित-सुशिक्षित, बाया, पोरे, म्हातारे, सर्वच थरातील लोक येत़ कोणी कामिक भाव घेऊन, कोणी संकल्प घेऊन तर कोणी सहज निष्काम भावाने़ बाबांच्या दर्शनाने सर्व सदिच्छांची पूर्ती होते हाच सर्वांचा अनुभव आहे़ परंतु कामिक भावांच्या लोकांना मात्र बाबा त्वरितच वाटेला लावायचे़ येणार्‍यांच्या मनातील भाव न सांगताच बाबा ओळखत़ ते समोर आल्याबरोबर त्यांच्याशी स्वतःच बोलायला लागत़ सत्‌-संकल्पांना मात्र त्यांचा पूर्ण आशीर्वाद असे़ काही दुःख-पिडीतही येत़ रोगग्रस्तही आपली व्यथा घेऊन येत़ त्या सर्वांसाठी बाबांजवळ एकच प्रसाद़ तो म्हणजे वडिलांच्या समाधीवर उगवलेल्या कडुनिंबाची पाने़ दोन चार पाने त्यांनी तोडावी व प्रसाद म्हणून निष्ठेने खावी़ ह्याच प्रसादाने अनेकांच्या व्याधी हटल्या आहेत़ मनाला शांती लाभली आहे़.
निष्काम भावाने आलेले जीव बाबांना फार आवडत़ त्यांच्याशी तास न्‌‌ तास ते बोलत बसत़ कंटाळा कसा तो त्यांना माहीतच नव्हता़ त्यांच्या बोलण्याला विषयांची उणीव नसे़ व्यक्तीची जिज्ञासा हेरुन ते तिच्याशी कोणत्याही विषयावर बोलत़ वेदपुराण, भौतिकशास्त्र, अध्यात्मशास्त्र, गीता, काव्य, साहित्य असा कोणताही विषय ते सारख्याच प्रभावाने रंगवीत असत़ बोलता बोलता ते संतकवींच्या अभंग-ओव्याचे दाखले देत़ तर कधी गोविंदाग्रजाच्या द्यमुरलीद्ग वा द्यस्मशानातील गीतद्ग अशा प्रकारच्या कवितेतील कडवेचे कडवे मुखोद्‌गत म्हणून दाखवित़ कधी नवकाव्य, कधी साहित्यातील रस वर्णन, तर कधी चालू इझम (कम्युनिझम वगैरे) नानापरीचे विषय ते सारख्याच चवीने हाताळीत़ त्यांचे बोलणे मात्र अत्यंत रसाळ मेजवानीसारखे असे़ ऐकणाराला कंटाळा कसा तो वाटतच नसे़ ऐकावे, केवळ ऐकतच रहावे असे त्याला वाटे़ त्यामुळे काही सद्भक्त त्यांना रसाळ रसवंती म्हणत असत़.
हिंदुच्या धर्मग्रंथाबरोबरच मुस्लीम व ख्रिस्ती धर्माचे ग्रंथ कुराण व बायबल यांचाही अभ्यास बाबांनी पूर्ण केला होता असे वाटायचे़ केव्हा केला हे एकतर बाबा किंवा भगवंतच जाणे ! गोष्ट मात्र अनुभवाची आहे़ एकदा दोन मुसलमान बंधु बैठकीत आले आणि कुराण वाचले काय म्हणून पृच्छा करू लागले़ त्यावर बाबा म्हणाले, द्यद्यसर्वच अभ्यास झाला आहे़ काम पडेल तेव्हा भगवंतच स्मरण करुन देतोद्गद्ग नंतरच्या संपूर्ण बाबांनी कुराणातील अनेक श्लोक व बायबलमधील कितीतरी उतारे अस्खलीतपणे ग्रंथाच्या भाषेबरहुकूम म्हणून दाखविले़ त्यातील गूढार्थही उकलून दाखविला़ तेव्हा ते मुस्लिम बंधू कमालीचे आश्चर्यचकित झाले़ बाबांना लोकांचा कंटाळा कधीच येत नसे़ माणसाचा दर्जा, जात, धर्म, पंथ यात कधीही भेदभाव राखल्या जात नसे़ कोणातही ते मिसळत़ कोणाशीही सारख्याच पे्रमाने बोलत़ आडपडद्याचे काम नसे़ सारा खुल्लम खुल्ला व्यवहाऱ कधी ते कौटुंबिक शेतीवाडीच्या गोष्टी करतांना आढळत़ तर कधी नातेवाईकांच्या, इष्टमित्रांच्या बरोबर वैयक्तिक सुख दुःखाची चर्चा करतांना दिसत़ लोकात राहून नसण्याची, जनांत राहून एकांतात राहण्याची दुर्लभ हातोटी त्यांना साधलेली होती़ त्याचप्रमाणे बाबा कधीही पूर्जा-अर्चा, व्रतवैकल्ये वगैरे कर्मकांडात स्वतः गुंतलेले नसत किंवा तसे करण्याचा कोणाला कधी उपदेशही करीत नसत़ तीर्थाटन, यात्रा, वार्‍या या बाबतही ते कुणाला आग्रह करीत नसत़ परंतु कोणी नेम धरणारे असले तर त्यांना अडवितही नसत़ ज्याला जशी अंतःप्रेरणा होईल, जसे मनाला रुचेल, पचेल, त्याप्रमाणे त्याने करावे हा त्यांचा नित्याचा उपदेश़ फक्त जपायचे एवढेच की आचारातून विचाराचा धागा सुटायला नको़ विचाराचा संदर्भ सुटला की आचार अनाचार ठरतात़ परमेश्वर विश्वातील सार्‍या वस्तुमात्रात ओतप्रोत भरलेला आहे़ मग अमुक ग्राह्य व तमुक निषिद्ध हे ठरवावे कशाला ?
बाबा सगळ्या घटनांकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघत़ चमत्काराचे त्यांना वावडे होते़ भोळेपणा, अंधश्रद्धा, सोंग-ढोंग ह्यांना त्यांच्याजवळ स्थान नसे़ मीनाक्षी मोहनराव ह्या उच्चशिक्षित विदुषीचे मनोभ्रम नाथ सहज बोलण्यातून दूर सारीत़ पे्रमळ वाणीने तिच्याठायी आत्मविश्वास जागा करीत़ अनेकांना जगण्याचे बळ त्यांच्या सहज बोलण्यातून लाभत असे़ त्यांचे एक निःसिम भक्त, जळगांवचे श्री तुकाराम पाटील ह्यांनी तर बाबांना बोलके ब्रह्म हे नामाभिधानच देऊन ठेवले आहे़
सर्व प्रकारच्या ऐहिक भेदभावांपासून बाबा आलप्त होते़ जाती, धर्म, पंथ, वगैरे कशाचाच त्यांना विटाळ नव्हता़ जिज्ञासु भाविक मंडळी जमली की बाबांची बैठक चांगलीच रंगत असे़ त्यांच्या मुखातून तेजस्वी विचार-मौक्तिकांच्या लडीच्या लडी बाहेर सांडू लागत़ बोलता बोलता बाबा तुकारामचे कितीतरी अभंग दाखले म्हणून देत असत़ अभंग गाथा जणुकाय त्यांना मुखपाठ ? कधी लहर आली की बाबा कबीराचे दोहे अथवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पदे गुणगुणण्यात निमग्न असायचे़ ‘हरिभजनाची रुची जयाच्या हृदय-कमली लागली तयाची प्रपंच रुचि फांकली’ हे राष्ट्रसंतांचे भजन त्यांचे फार आवडीचे़ साधक मंडळीला बाबा नेहमी आवडते उदाहरण देत असत़.
एक दिवसाचा प्रसंग़ मलकापूरचे डॉ़ पाटील भर दुपारी बाबांकडे आले़ ते मुक्ताबाईंचे (मेहूण) परमभक्त़ त्यांना फक्त एक निरोप सांगायचा होता़ मलकापूरला त्यांना एक स्वप्न दृष्टांत होऊन मुक्ताबाईं कडून आज्ञा मिळाली की त्यांनी बाबांकडे येऊन सांगावे, तुम्ही चर्पटीनाथांचे अवतार आहात़ फक्त हा निरोप सांगून परत फिरावे़ तेथे काहीही सेवन करू नयेद्ग श्री पाटील हातरूणास येऊन निरोप सांगते झाले व फक्त पाणी पिऊन आवलंब माघारी परतले़ हेच डॉ़ टी़ के़ पाटील पुढे लिंगनाथ नावाने प्रसिद्धीस आले़.
तेल्हार्‍याच्या काही सद्गृहस्थांनी कमलाबाई जळगावकर यांच्या जलशाचा एक प्रयोग करून हातरूणच्या मंदिरासाठी काही निधी गोळा केला होता़ ती सर्व रक्कम घेऊन सर्वश्री रामसिंगजी बलोदे, तोताराम पाटील, ठाकुरदासजी तापडीया वगैरे काही मंडळी बाबांकडे गेली़ त्या रकमेचा देवळासाठी बाबांनी स्वीकार करावा अशी त्यांनी विनंती केली़ ते येणार म्हणून बाबांनी अगोदरच मंदिरासमोरील अंगण स्वतः झाडून साफ करून ठेवले होतेच़ मंडळीची विनंती ऐकून बाबा म्हणाले, मी कोण ही रक्कम ठेवणार? मी तर येथला झाडपूस करणारा सेवक आहे़ आपण सर्व गालीचांवर बसणारे़ आपल्याकरिता बिछायतसुद्धा माझ्याजवळ नाही़ या रेतीवर बसवूनच आपले आदरातिथ्य करावे लागते़ तेव्हा ही रक्कम आपल्याजवळच असू द्या़ आपल्यास जे बरे दिसेल ते आपण स्वतःच त्या रकमेतून मंदिरासाठी करा़ मी कशाला ती रक्कम घेऊ ? असे म्हणून बाबांनी त्या पैशांची थैली श्री रामसिंगजी बलोदे यांच्या स्वाधीन करून दिली़ सर्व मंडळी परत गेली़ अर्थात त्यांनी ती सर्व रक्कम मंदिर बांधणीच्या कामात थोडेच दिवसात खर्च करून टाकली हे निराळे सांगणे नकोच़.
एक तरूण बाबांच्या दर्शनासाठी आला़ बी़ कॉम़ झालेला असल्यामुळे कुठे तरी नोकरीचे जुळावे हा त्याच्या मनातील हेतु़ बाबा शेतात पर्‍हाट्या वेचीत होते़ हातचे काम सुरूच ठेवले, व म्हणाले, नोकरी नाही म्हणून रिकामे कशास रहावे? तोपर्यंत घरच्या शेतीतच असे काम करावे मुलगा बिचारा काय बोलणार? त्याच्या घरी शेती होतीच़ आल्या पावली तसाच परत फिरला पलायन शिकवितो तो धर्म नव्हे़ कंबर कसून जगायला लावतो तोच खरा धर्मबोध़ कोण्या देवळात किंवा मूर्तीतच देव असतो हे बाबांना पटत नसे़ तो सर्वव्यापी आहे, अणुरेणुत आहे, प्रत्येक जिव-मात्रात आहे, असा अनुभव त्यांना आलेला आहे़ दृश्य-अदृश्य सारे विश्व त्याचाच लीलाविलास आहे़ यालाच ते गीतेतील विराट-रूप दर्शन म्हणतात़.
एक दिवस गांवातील तुळशीराम डोंगरे नांवाचे एक गृहस्थ बाबांकडे आले़ दारिद्र्यामुळे संसाराचा त्यांना वैताग आला होता़ जीव देऊनच प्रापंचिक अडचणीतून सुटका करुन घ्यावी असा त्यांनी मनाशी निर्धार केला होता़ शेवटची भेट म्हणूनच ते बाबांच्या दर्शनास आले होते़ समोर येताच बाबा उद्गारले, प्राण देऊन पाठीमागचा संसार सुटणार थोडाच आहे ? पुढच्या जन्मी पुन्हा तो चिकटेलच़ तेव्हा आताच त्याच्याशी मुकाबला का करू नये ? डोंगरेंनी आपली पूर्ण निराधार परिस्थिती कथन केली, आणि आत्महत्त्येशिवाय आता ह्यातून सुटका नाही असा मनोदय पुन्हा प्रगट केला़ ते ऐकून बाबा चटदिशी उठले़ घरात गेले़ एक धोतर हाती घेऊन आले व म्हणाले, द्यद्यहे पहा, माक्याजवळ सध्या एक धोतर आहे़ अर्धे तू घे़ घरात आज एक पायली ज्वारी आहे़ अर्धी तू घेऊन जा़ आजचा दिवस भागला़ पुढे ईश्वर दया करीलच.
बाबांची भावस्थिती कधी कधी बदलत असे़ एखाद्या दिवशी त्यांच्यात स्त्रीभाव जागृत होत असे़ तशी सूचना ते जवळच्या मित्रमंडळींना देत असत़ आणि खरोखरीच थोड्याच वेळात पुष्कळशा स्त्रीया आरत्या घेऊन त्यांची पूजा करायला आलेल्या आपणास दिसत़ मग त्या दिवशी दर्शनास येणार्‍यात स्त्रीयांचीच संख्या जास्त असे़ एकदा बाबांचा राधाभाव सहा महिने टिकून राहिला़ पुढे ग्रंथात राधारूपाध्यात त्यांनी कात्यायनी व्रत केल्याचा सुद्धा उल्लेख आहे़.
एकदा त्यांना काटेलच्या गुलाबबाबांची भेट घेण्याची प्रेरणा झाली़ दुसरे दिवशी सकाळीच काटेलला जाण्यास पायी निघाले़ त्यांच्या मागोमाग तेल्हार्‍याचे शंभर-दिडशे स्त्री पुरुष सुद्धा जाऊ लागले़. सर्व मंडळी काटेलला पोहोचली़ गुलाबबाबा आतुरतेने वाट पाहत होतेच़ बाबा पोहोचता क्षणीच दोघांनीही परस्परांना दृढालिंगन दिले़ क्षेमकुशल विचारपूस संपली़ गुलाबबाबा म्हणाले, पोरगा बापाच्या भेटीची आतूरतेने वाट पहात होता हो नाथबाबा म्हणाले, आम्ही काय गादलेली माणसं तुमची बरोबरी कसे करू? गुलाबबाबा हसून उद्गारले,अस्सं काय ! थांबा, तुमचा गादलेपणाच धुवून देतो जवळच नागपूरच्या राजहंसबाई-गुलाबबाबाच्या माताजी उभ्या होत्या़ त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, आई ह्यांना चांगले स्वच्छ करुन द्या आणि खरोखरच त्या आईनी व गुलाबबाबांनी नाथबाबांचे अंग स्वतः हातांनी घासून पुसून तेथील प्रसिद्ध कुंडातील पाण्याने धुवून दिले़ त्यावेळेस गुलाबबाबांनी झाला महार पंढरीनाथ हे भजन-गीत इतक्या तन्मयतेने गाइले की ऐकणारे सांगतात, आम्ही सिनेमांत सुद्धा हे गाणे ऐकले होते पण इतकी गोडी वाटली नाही़
असे लीला-खेळ करीत करीत बाबांचा जीवनधर्म सुरू होता़ गीतेच्या पाचव्या अध्यायात भगवंतानी योगयुक्त ज्ञानी पुरुषाची पूर्ण साक्षात्कारी पुरुषाची नेमकी लक्षणे सांगितली आहेत़ ज्ञानोबा तुकोबादि साक्षात्कारी संतानीही आपल्या वाणीतून खर्‍या संताच्या काही खुणा वर्णिल्या आहेत़ त्या सर्व बाबांच्या ठायी उमटल्या आहेत असे अनुभवांती वाटू लागते़ निसर्ग-नियमांमधून साधू-संतांना सुद्धा सुट, सवलत मिळत नाही़ ऐंशीपार वय झालेल्या महाराजांना सुद्धा शरीर साथ देईनासे झाले़ अखंड भक्तांच्या घोळक्यात आराम मिळेनासा झाला़ वृद्ध शरीरावर आजार हल्ला करीत राहिले़ महाराज सहजपणे हसतमुखाने नियतीचे वार झेलत राहिले़ रोगाला औषध आणि भुकेला भाकर आवश्यक असते; हे तत्त्वज्ञान ते आयुष्यभर सांगत राहिले़ स्वतः सुद्धा आजारी अवस्थेत त्यांनी औषधोपचार घेतला़ डॉ़ एस़ एम़ अग्रवाल ह्या निष्णात वैद्याने सेवाभावाने त्यांचेवर अखेरपर्यंत उपचार केलेत़ जेवढ्या सहजतेने त्यांनी जीवन स्वीकारले तेवढ्याच सहजतेने मृत्यूसुद्धा पत्करला़ अंतिम सत्याला ते हसतमुखाने सामोरे गेले़ कार्तिक शु़ ७, दि़. ३-११-२००० रोजी त्यांनी देह ठेविला़ पार्थिव यात्रा कार्तिक शु़ ८, दि़ ४-११-२००० रोजी संपुष्टात आली़ आपली जीवनसंगिनी वत्सलामाता यांचे शेजारी पूर्वीच दाखविलेल्या जागेवर ते चिरसमाधीलीन झाले़.
कर्म, ज्ञान, योग व भक्ती या सर्वांचा अपूर्व संगम बाबांच्या ठिकाणी झालेला दिसतो़ ब्रह्म साक्षात्कारानंतर बुद्धी समदर्शनी होते़ भेद गळून पडतात़ चित्तवृत्ती निरंतर आत्मस्वरुपीब्रह्मानंदी लीन राहतात़ निहित कर्मे आचरूनही नैष्कर्म्य राखल्या जाते़ उपस्थित भोग भोगूनही सर्वांगभाव आलप्तच असतात़ मनाचे मनपण जाऊन उन्मनी अवस्था प्राप्त होते़ ही सर्व चिन्हे बाबांच्या वागण्यामधून स्पष्टपणे दिसून येत़ अशा दुर्लभ योगी संताच्या परम पवित्र दर्शनाचा सुयोग ज्यांना जीवंतपणी लाभला, ते जीव निःसंशय कृतार्थ होत़.
उसे हमने बहुत ढुंढा, न पाया । अगर पाया तो, खोज अपना न पाया ॥
माणूस प्रथम भगवंताचा पत्ता शोधत फिरतो़ तो सापडत नाही़ पण जेव्हा गवसतो तेव्हा माणूस स्वतःलाच हरवून बसतो़.स्वतः हारपून जाण्यासाठी जो तयार होईल, तत्‌क्षणी तोच भगवंत होईल़

मूळ लेखन : वसंत पंजाबराव मालपे

संकलन : सौ. वंदना प्रदीप चौधरी

0 comments:

आभार

प्रस्तुत ब्लॉगकरिता सौ.सरिता ढवळे,नाशिक ह्यांनीwww.nathbaba.org हे डोमेन रजिस्टर्ड करून दिले.त्या डोमेनवरही हा ब्लॉग उपलब्ध आहे.त्यांचे आभार,
LinkWithin Related Posts with Thumbnails

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP