गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११

गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ प्रसिद्ध झाला.जागतिक कीर्तिच्या प्रख्यात लेखिका शोभा डे,रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविणार्‍या वर्षा उसगावकर यांच्यासह अनेक नामवंतांचा सहभाग असलेला हा अंक आहे. येथे *गझलकार सीमोल्लंघन विशेषांक २०११ * वाचा
*श्री नाथबाबा शांती मंदिर संस्थान,हातरुण ता.बाळापूर जि.अकोला_ सार्वजनिक न्यास नोंदणी क्र.ए-१६७३(अकोला)*
Related Posts with Thumbnails

शब्दांच्या पलिकडले : सतिश पिंपळे


माझे गुरुवर्य संत वासुदेव महाराज यांनी या पोथीसाठी चित्रे काढून घेण्यास माक्या नावाचा अनुरोध करावा हीच तर मोठी भाग्याची गोष्ट आहे़ असे करतानाच द्यत्याद्ग संत विभूतीच्या प्रत्यक्ष सान्निध्यात वावरण्याची शक्तिही ते प्रदान करीत असतात, अन्यथा सामान्य माणसाला हे शक्य नसते़
साध्या, सोप्या, रसाळ भाषेत असलेल्या भावसुंदर पोथीची पारायणेच मला करावी लागली़ जेवढ्या सहजतेने लेखकाने त्या ओव्या लिहिल्यात तेवढेच कठीण चित्र काढण्याचे काम आहे हे लक्षात आले़ द्यचित्रांमधून अवतरित व्हावेद्ग अशी नाथांनाच प्रार्थना करीत चित्रांना प्रारंभ झाला़ प्रथम रोज २-३ अध्याय वाचून चित्रे काढावीत असे वाटले, त्याप्रमाणे ६-७ दिवसात १२ व्या अध्यायापर्यत आलो़ एके दिवशी मला गजानन महाराज मागून मिठी मारीत आहेत असे वाटले़ अनुभवाचा प्रथम श्रोता माझी सहधर्मचारिणी सौ़ पद्मा असते त्याप्रमाणे तिला सांगितले़ त्या दिवशी स्टुडिओमध्ये अध्याय १३ ते ३० अशी सलग चित्रमालिका तयार झाली, ह्याचे मला अजूनही आश्र्चर्य वाटते़
ही चित्रे नसून जणू नाथांच्या समवेत त्यांच्या बालपणापासून त्यांच्या अनुभवांसमवेत मीही होतो असे वाटावयास लागले आणि त्यामुळेच की काय त्यांची द्यदेहबोलीद्ग मी अनुभवू शकलो व चित्रातून उतरण्यासाठी संत वासुदेव महाराजांची दिव्य शक्ति कार्यरत होती, मी फक्त एक माध्यम होतो़ ही चित्रे द्यमी काढलीतद्ग असे म्हणताच येत नाही़ असे अनुभव येण्यासही भाग्य लागते़ मातृकृपा आणि संतकृपा प्रसादानेच हे शक्य झाले़
मी अजूनही लेखकाला प्रत्यक्ष भेटलो नाही परंतु द्यचित्रांमुळे पोथी जिवंत झालीद्ग असा त्यांचा निरोप ऐकला आणि धन्य झालो़
पूर्वी थोडा चिकित्सक होतो़ अनेक विद्याविभूषित, सुशिक्षित तज्ज्ञ मंडळींसमवेत होणार्‍या चर्चेमुळे ते असेल, द्यमिरॅकल्सद्ग किंवा द्यचमत्कारद्ग यावर विचार करण्याची थोडी वेगळी दृष्टी होती़
चित्रांमधून येणार्‍या इतर व्यक्तिरेखांची रेखाटने पाहिल्यावर लेखकाने काही व्यक्तिंबाबत असे सांगितले की, त्या वेळच्या व्यक्ति ह्याच होत व त्यांचीच ही चित्रे आहेत़
चित्रे ह्याच हातातून अवतरली व ही गोष्ट मलाच माहीत नसावी, हे आश्चर्य नव्हे काय?

-सतिश पिंपळे
मधुमालती विहार, रतनलाल प्लॉट, अकोला़
फोन : (०७२४) २४३३००७, मो़ ९८५०१ ९९३२३

0 comments:

आभार

प्रस्तुत ब्लॉगकरिता सौ.सरिता ढवळे,नाशिक ह्यांनीwww.nathbaba.org हे डोमेन रजिस्टर्ड करून दिले.त्या डोमेनवरही हा ब्लॉग उपलब्ध आहे.त्यांचे आभार,
LinkWithin Related Posts with Thumbnails

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP