दोन शब्द : श्याम पारसकर
शांतिलीन प़ पू़ महादेवनाथ बाबांची आज सातवी पुण्यतिथी़ ह्या पुण्यदिनी श्री महादेवनाथ चरित्र ग्रंथ आपल्या हाती देतांना अत्यानंद होत आहे़ नाथांचे सर्वार्थाने दास श्री महादेवदास सोनोने ह्यांच्या लेखणीमधून हे नाथचरित्र अवतरित झालेले आहे़
शांतिमंदिर प्रकाशन मंडळाचे हे सातवे पुष्प़ ह्यापूर्वी नाथांचे आद्यचरित्रकार स्व़ वसंत पंजाबराव मालपे ह्यांनी संतयोगी श्री यादवनाथ महाराज आणि सद्गुरू नाथबाबा ह्या पिता-पुत्रांचे गद्यचरित्र ‘हातरूणचे नंदादीप’ ह्या नावाने लिहिलेले आहे़ त्याची प्रथमावृत्ती इ़ स़ १९७१ मध्ये शांतिमंदिर प्रकाशन मंडळाद्वारे प्रकाशित झालेली आहे़ ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, यादवनाथ-महादेवनाथांचे गद्य चरित्रासोबतच अध्यात्म पथिकांना प्रेरक आणि पथदर्शी ठरतील असे श्री यादवनाथांनी लिहिलेले अभंग, श्री महादेवनाथ बाबांनी साधनासाफल्यांती लिहिलेले अभंग एकत्र संकलित करून मोठ्या प्रेमजिव्हाळ्याने आपल्या हाती सोपविलेत़ सोबतच दुसर्या आवृत्तीमध्ये आढळणारे नितांत भावसुंदर असे त्या अभंगावरील सार्थ मुक्तचिंतन साधकास त्याची दशा आणि दिशा यांचे अचूक मोजमाप दाखवणारे आहे़ त्याबद्दल स्व़ मालपे गुरुजींचे आम्ही सदैव ऋणी राहावयास हवे़
शांतिमंदिर प्रकाशन मंडळाने त्यानंतर श्री यादवनाथ योगलीलामृतद्ग हा यादवनाथ चरित्र ग्रंथ इ़ स़ १९७३ मध्ये प्रकाशित केला़ तसेच नाथभक्तांसाठी ह्या योगलीलामृत ग्रंथाचेच लघुरूप द्यश्री यादवनाथ स्तोत्रद्ग प्रकाशित केले़ सदर दोन्ही ग्रंथ श्री महादेवदास सोनोने यांनी ओवीबद्ध केलेले आहेत़
इ़.स़. १९७४ मध्ये श्री नाथ प्रसादगीते हा मधुकर बनकर ह्या कवीने रचलेला नाथभक्तिगीतांचा संग्रह मंडळाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला़ त्यापाठोपाठ कु़ देवका देशमुख ह्यांनी गद्यरूपात लिहिलेले यादवनाथ चरित्र
महामानवाची जीवनगाथा ह्या लघुग्रंथरूपाने प्रसिद्ध झाले़
ह्या कालावधीत शांतिमंदिर प्रकाशन मंडळाचे मुखपत्र द्यशांतिसुधा हे विदर्भातून प्रसिद्ध होणारे आध्यात्मिक मासिकपत्र सातत्याने नियमित सुरू राहिल्याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो़
इ़.स़. १९८० मध्ये शांतिमंदिराचे सांगोपांग दर्शन घडविणारे आणि पू़ महादेव नाथ बाबांची उत्तरार्धातील छबी आपल्यासमोर उभी करणारे शांतीच्या माहेरी हे श्याम नाथांनी लिहिलेले छोटेसे पुस्तक मंडळाने प्रकाशित केलेले आहे़
तथापि पू़.महादेवनाथ बाबांचे समग्र जीवनदर्शन घडविणारे असे चरित्र ग्रंथरूपाने अद्याप उपलब्ध झालेले नव्हते़ नाथबाबांच्या समाधीनंतर ही उणीव आधक जाणवायला लागली़ इ़ स़ २००४ मध्ये समाधिस्थानी मंदिर उभे झाले़ धवलपाषाणातील नाथमूर्ती भक्तदर्शनार्थ स्थिरावल्या़ दर रविवारी नाथ दरबारी सत्संगासाठी जमणार्या नाथभक्तांना आता हवे होते बाबांचे ग्रंथरूप चरित्ऱ वाचन, मनन, स्मरण, चिंतन याकरिता फलदायी सद्गुरूंचा जीवनग्रंथ़ माक्यासह काही सद्भक्तांनी श्री महादेवराव सोनोने ह्यांना विनंती केली की, आपण बाबांचा चरित्र ग्रंथ लिहावा़ भक्तांची इच्छा हीच नाथबाबांची आज्ञा जाणून त्यांनी ३० एप्रिल २००६ रोजी अक्षय्य तृतियेला ग्रंथलेखनास प्रारंभ केला़ श्री सोनोने बाबांचे वय वर्षे अठ्ठ्याहत्तऱ कानांनी ऐकणे बंद केलेले़ डोळ्यांसमोर चार बोटे अंतरावर कागद धरला की अक्षरे लावून वाचण्यापुरते अस्पष्ट, अंधुक-अंधुक दिसायचे़ शरीर थकलेले़ मन मात्र प्रफुल्लित़ नाथबाबांचे स्मरण ताजे टवटवीत़ अन्य सांसारिक गोष्टी मात्र विस्मृतीत गेलेल्या़ अशा विकल शारीर अवस्थेत लेखनारंभ झालेला़ पंधरावे अध्यायसत्र पूर्ण झाल्यानंतर सोनोनेबाबांना आजाराने गाठले़ औषधोपचारासाठी दवाखान्यात भरती राहावे लागले़ लेखन थांबले़ धीर खचला़ माझे हातून गुरूचरित्र लेखनसेवा पूर्ण होईल का अशी शंका त्यांचे मनात डोकावयाला लागली़ तथापि नाथबाबा माझे हातून ग्रंथ पूर्ण करवून घेतीलच असा ठाम विश्वास मनात जागला़ नाथबाबांनीच आजारातून तारले, सावरले़ साधारणतः दोन महिन्यांनी लेखनास पुन्हा गती आली़ नाथांसमोर बसूनच दि़ २३ जानेवारी २००७ ला वसंतपंचमीस तिसावे अध्यायसत्र लिहून पूर्ण झाले़ त्याचदिवशी त्यांनी तो ग्रंथ नाथबाबांचे चरणी अर्पण केला़ आणि प्रकाशनासाठी मंडळास सोपविला़
ह़.भ़.प श्री वासुदेव महाराजांनी लेखकास सूचविले की, प्रत्येक अध्याय सत्रारंभी त्या त्या अध्यायसत्रातील कथावस्तूवर आधारित प्रसंगचित्रे ग्रंथात असावीत़ ही रेखाचित्रे तुम्हाला अकोल्याचे प्रसिद्ध चित्रकार श्री सतिश पिंपळे काढून देतील़ सतिश पिंपळेंनी ग्रंथाची पारायणे केली़ प्रारंभी एक-एक अध्याय वाचून चित्रे रेखाटली़ बाराव्या अध्याय चित्रानंतर मात्र त्यांनी पहाटेपासून सायंकाळपर्यंत एकाच बैठकीत झपाटल्यागत एकवीस चित्रे काढलीत़ पिंपळेंचा हा अनुभव शब्दांच्या पलिकडला असल्याचे त्यांनी नोंदविले़ शांतिमंदिर व्यवस्थापक श्री जगदिशभाऊ पाठक ह्यांचेकडील नाथबाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह त्यांनी उपलब्ध करून दिला़ त्यामुळे ग्रंथाच्या सुरूवातीला व प्रत्येक अध्यायाच्या शेवटी नाथबाबांची वेगवेगळ्या अवस्थांमधील छायाचित्रे आणि अन्य सद्भक्तांची छायाचित्रे समाविष्ट करता आलीत़ सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे़.
श्री शिवशंकरभाऊ पाटील, व्यवस्थापक श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव ह्यांनी वेळोवेळी पे्रमळ सूचना आणि प्रकाशनाचे दृष्टीने योग्य मार्गदर्शन केले़ ग्रंथनिर्मिती, संपादन, प्रकाशनाचे प्रत्येक टप्प्यावर श्री पुरुषोत्तमजी पसारी यांनी जागरूकतेने लक्ष घातले़ मुद्रकांकरवी ग्रंथाची प्रत हाती पडेपर्यंत स्वतः झटलेत़ त्यांचा ऋणी राहण्यातच मला धन्यता वाटेल़.
ह़ भ़ प़ श्रीधरस्वामी महाराज, पंचगव्हाण ह्यांचा नाथबाबांसमवेत जिव्हाळ्याचा संबंध़ त्यांनी आस्थेने ग्रंथगरिमा वर्णन आणि स्वानुभव प्रकटीकरण केले़.
डॉ़ श्रीकृष्ण नारायण राऊत ह्यांनी ग्रंथास साजेशी प्रस्तावना लिहिली़. सुबक सुंदर छपाईचे काम श्री हरिषजी मानधणे, प्रगति प्रिंटिंग प्रेस यांनी मनोभावे पूर्ण केले़.
श्री गोपाळ देशमुख ह्या भाविक सद्गृहस्थाने संपूर्ण ग्रंथाचे टाईपसेटींगचे काम कोणतेही मोल न घेता सेवाभावाने केले़ चि़ सुनील, प्रशांत मानधणे या भावंडांनी छपाईचे कामात विशेष लक्ष घातले़ मुद्रित शोधनाचे काम सौ़. सपना साकरकार, सौ़. कविता पारसकर आणि श्री गजानन सोळंके गुरूजी ह्यांनी फार काळजीपूर्वक केले़.
नाथचरित्र ग्रंथाची छापील प्रत हाती पडली़. श्री रोहित पटेल, श्री घनश्याम लाहोटी, श्री प्रभुदयाल भाला, श्री प्रदीप अग्रवाल, पं.प्रदीप शर्मा, गजानन दाणे, गजानन सोळंके ह्या नाथभक्तांच्या अथक परिश्रमांचे सार्थक झाले़.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. शेवटी ह्या नाथचरित्र ग्रंथापासून सर्व नाथभक्त, भाविक व सत्संगी वाचक मंडळीस सदाचरणाचे बळ, सत्कार्याची पे्ररणा, जगण्याचा खराखुरा आनंद व आत्मकल्याणपर बोध प्राप्त होवो ही नाथांचरणी प्रार्थना़.
- श्याम नाथ पारसकर
0 comments:
Post a Comment